खासदार सुनील तटकरे (फोटो- सोशल मीडिया)
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार अशी शक्यता
सुनील तटकरे यांनी केले विधान
Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. काल बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, “अजितदादांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून आम्ही कोणीही सावरलो नाही. अजूनही दादा आमच्यात आहेत असे आम्हाला वाटत आहे. त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे माझ्यासाठी क्लेशदायक आहे. सर्व परिवाराशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही ठरवू. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकमग्न आहे. उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. धार्मिक विधी झाल्यानंतर सुनेत्रा पवारांशी चर्चा करून निर्णय घेऊ.”
राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना महत्त्वाचं पत्र?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात अजितदादांसह चार जणांचा अंत झाला. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत आणि रिक्त झालेल्या मंत्रिपदांबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजितदादांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादीचे नेतृत्व आता कोणाकडे सोपवायचे, हा मोठा प्रश्न पक्षासमोर आहे. पक्षात अशा एका गटाची भावना आहे की, सहानुभूती आणि वारसाहक्क म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवावे आणि त्यांनाच उपमुख्यमंत्रीपद द्यावे. तर, दुसरीकडे, पक्षातील अनुभवाचा विचार करता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे.
अजित पवारांसाठी पुणं थांबलं! ‘दादां’च्या जाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना तात्पुरता विराम
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अधिकृत पत्र दिले जाणार आहे. अजित पवारांकडे अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खात्यांची जबाबदारी होती. ही तीनही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याची असल्याने ती आपल्याकडेच राहावीत यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. त्यामुळे ही खाती राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावीत यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.






