मीरा-भाईंदर : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरात भाजपाने युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी यासाठी काही ठोस अटी व शर्ती मांडल्या आहेत. भाजप स्वतःसाठी ६६ जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी ८ जागा देण्यास तयार असून उर्वरित २१ जागांबाबत शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे.
युतीसाठी ठेवण्यात आलेल्या अटींमध्ये भाजपाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, भाजप पक्षातून शिवसेनेत गेलेले सर्व पदाधिकारी पुन्हा भाजपात परत करण्यात यावेत. ही अट पूर्ण झाल्याशिवाय युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार नसल्याचे संकेत भाजपाने दिले आहेत.
तसेच शिवार गार्डनच्या व्यावसायिकीकरणाचा मुद्दाही भाजपाने उपस्थित केला आहे. शिवार गार्डनचे व्यावसायिकीकरण तात्काळ थांबवण्यात यावे, अशी अट भाजपाने युतीसाठी पुढे ठेवली आहे. या सर्व अटी मान्य झाल्यासच भाजप युती करण्यास तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या अटींवर शिवसेनेची भूमिका काय राहणार आणि प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या चर्चेतून तोडगा निघतो का, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मीरा-भाईंदरमधील आगामी राजकीय समीकरणे या वाटाघाटींवर अवलंबून राहणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.