विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात मनसे अॅक्शन मोडवर; भाईंदरमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसे देखील मीरा भाईंदरमध्ये अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. नुकतंच पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्य़ात आलं होतं. कार्यक्रमाला मनसे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते प्रकाश महाजन उपस्थित होते. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान पक्षाची विधानसभेसाठी धोरणं तसंच कार्यकर्त्यांशी सुसंवाद घडण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याचा हेतू होता.