मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शुक्रवारी (दि.2) कोल्हापुरात येणार असून, प्रचार शुभारंभाचा नारळ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत फोडण्यात येणार आहे. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रोड शोचे आयोजन करण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचा पहिल्यांदा कोल्हापूर दौरा असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा दोन ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या निमित्ताने होणार आहे. रवींद्र चव्हाण कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर अंबाबाई दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांची पदयात्रा होणार आहे. कोल्हापूर तसेच इचलकरंजी मनपात आपलाच महापौर व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. जागा वाटपामध्ये कोल्हापूरमध्ये भाजपाच मोठा भाऊ ठरला आहे. भाजपच्या वाट्याला ३६ जागा असून शिवसेना शिंदे गट ३० जागा लढवत आहे, तर राष्ट्रवादी १५ जागांवर निवडणुकीच्या रिंगणात आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात लवकरच ‘कमबॅक’? कोर्टाकडून दिलासा मिळताच चर्चांना उधाण
मुख्यमंत्री काही काळ कोल्हापुरात येणार असून, त्यानंतर रवींद्र चव्हाण हे शहरात प्रदीर्घ वेळ थांबणार आहेत. कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत झाला असून, ८१ जागांमध्ये भाजप मोठा भाऊ आहे. भाजप ३६ जागांवर निवडणूक लढवणार असून, शिवसेना ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्या आहेत.
कोल्हापूरमध्ये तिरंगी लढत होणार
कोल्हापूरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक आहेत. दुसरीकडे, तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्ष आहे.
हेदेखील वाचा : ‘मोदींचा फोन आला तरी आता माघार घेणार नाही’; भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक नाराज…






