न्यू यॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर जोहरान ममदानी यांनी तिहार तुरुंगात असलेल्या उमर खालिदला पत्र लिहून पाठिंबा दर्शवला आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Zohran Mamdani letter to Umar Khalid Jan 2026 : १ जानेवारी २०२६ रोजी न्यूयॉर्क (New York) शहराच्या इतिहासात एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनी न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर म्हणून शपथ घेतली. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्यानंतर त्यांनी जे पहिले काम केले, त्याने भारत आणि अमेरिकेतील मानवाधिकार वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणली आहे. ममदानी यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगात गेल्या पाच वर्षांपासून बंदिस्त असलेल्या उमर खालिद (Umar Khalid) याला एक विशेष हस्तलिखित पत्र पाठवून आपली जवळीक व्यक्त केली आहे.
उमर खालिदची जोडीदार बनोज्यत्स्ना लाहिरी हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर हे पत्र शेअर केले आहे. पत्रात ममदानी लिहितात, “प्रिय उमर, कटुतेबद्दलचे तुझे शब्द मला वारंवार आठवतात. ही कटुता स्वतःवर हावी होऊ न देणे किती महत्त्वाचे आहे, हे तू शिकवलेस. तुझ्या आई-वडिलांना भेटून खूप आनंद झाला. आम्ही सर्वजण तुझा विचार करत आहोत.” हे पत्र अशा वेळी समोर आले आहे जेव्हा उमर खालिद आपला पाचवा हिवाळा तुरुंगात काढत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
हे पत्र केवळ राजकीय नसून त्याला एक भावनिक किनार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये उमर खालिदचे वडील डॉ. एस. क्यू. आर. इलियास आणि आई साहिबा खानम हे त्यांच्या मुलीला (उमरची बहीण) भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. त्यावेळी त्यांनी जोहरान ममदानी यांची विशेष भेट घेतली होती. या अर्ध्या तासाच्या भेटीत ममदानी यांनी उमरच्या खटल्याबद्दल आणि त्याच्या आरोग्याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती. ममदानी यांनी उमरची तुरुंगातील डायरी आणि त्याची पत्रे वाचली असल्याचेही यावेळी सांगितले.
जोहरान ममदानी हे मूळचे भारतीय वंशाचे असून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि ख्यातनाम शैक्षणिक तज्ज्ञ महमूद ममदानी यांचे सुपुत्र आहेत. न्यूयॉर्क राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून काम केल्यानंतर त्यांनी २०२६ च्या निवडणुकीत महापदावर विजय मिळवून इतिहास रचला. ते सुरुवातीपासूनच मानवी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते राहिले आहेत. २०२३ मध्येही त्यांनी न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात उमर खालिदच्या पत्रातील काही भाग वाचून दाखवले होते.
US hypocrisy level: MAX NYC’s new Mayor Zohran Mamdani (champagne socialist from elite family) writes to Umar Khalid in Tihar:
“Dear Umar, I think of your words on bitterness often… We are all thinking of you.” Handed to Khalid’s parents in Dec 2025. Comes right after 8… pic.twitter.com/4a1uJBc7eN — Ravi Sunday Games (@ravi_sunday) January 2, 2026
credit : social media and Twitter
जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला सप्टेंबर २०२० मध्ये दिल्ली दंगलीच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून UAPA अंतर्गत अटक करण्यात आली होती. ५ वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही त्याला अद्याप नियमित जामीन मिळालेला नाही. नुकताच त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी १४ दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला होता, त्यानंतर तो पुन्हा तिहार तुरुंगात परतला आहे. सध्या त्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
ममदानी यांच्या पत्रासोबतच अमेरिकन काँग्रेसच्या ८ सदस्यांनी (ज्यात प्रमिला जयपाल आणि राशिदा तैब यांचा समावेश आहे) भारतीय राजदूतांना पत्र पाठवून उमर खालिदच्या प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. यामुळे आता उमर खालिदच्या सुटकेचा मुद्दा केवळ देशांतर्गत न राहता जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे.
Ans: जोहरान ममदानी हे भारतीय वंशाचे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम आणि दक्षिण आशियाई महापौर आहेत. ते प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांचे पुत्र आहेत.
Ans: उमर खालिदला सप्टेंबर २०२० मध्ये दिल्ली दंगलीशी संबंधित कटाच्या आरोपाखाली UAPA कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.
Ans: उमर खालिदने तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांत नेहमीच कठीण काळातही मनामध्ये कटुता न बाळगण्याबद्दल भाष्य केले आहे, त्याचा संदर्भ ममदानी यांनी दिला आहे.






