कणकवली/भगवान लोके: या जनता दरबाराचा फार्स होवू नये, कारण शासन आपल्या दारी यासाठी कोट्यावधीचा खर्च गेल्यावर्षी झालेल्या कार्क्रमात शासन आपल्या दारी यासाठी 5 कोटीचा खर्च झालेला आहे. परंतु त्यातूनसुद्धा शासनाचे प्रश्न सुटले नाहीत. हे आज वर्षभराने सत्ताधा-यांना समजून कळलं असेल. त्यामुळे तो 5 कोटीचा खर्च फुकट गेला. त्यामुळे या जनता दरबारावर जो खर्च झाला किंवा अधिकारी 4-4 दिवस तिथे होते, त्यातले किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. जनतेला या जनता दरबारचा फायदा झालेला नाहीये, जर फायदा झाला असेल तर पालकमंत्र्यांनी कोणकोणत्या तक्रारी सोडवल्या ते सिद्ध करून दाखवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.