पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मुळा नदी पात्रात सुरु असलेले नदी सुधार प्रकल्पाचे काम तात्पुरते स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र हे आदेश नदी सुधार प्रकल्पास विरोध करणाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी दिल्या गेल्याचे आरोप,पर्यावरण प्रेमींनी केले आहेतशहरातून वाहणाऱ्या मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकून आणि वृक्ष तोड करून हा प्रकल्प राबविला जात असल्याचा आरोप करत , अनेक पर्यावरण प्रेमींनी प्रकल्पाला विरोध केला होता, तर प्रकल्प उभारणीसाठी नदीचे पात्र भराव टाकून अरुंद होत असल्याने पाटबंधारे विभागाने देखील त्यावर आक्षेप नोंदविले होते ,या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीस नोटीस बजावत महापालिकेने प्रकल्पाचे काम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले ,मात्र आदेशात नमूद केल्या प्रमाणे ही स्थगिती संपूर्ण प्रकल्पास नसून काही मीटर अंतरावरील कामासाठीच असल्याने पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.