नवी मुंबईकर येथील रहिवाशांकडून सिडकोच्या विरोधात कायमच आंदोलनं केली जातात. गोर गरिबांच्या हक्काच्या जमिनी बळाकावून सिडको अनधिकृतपणे नवे प्रकल्प उभारत असल्याचा आरोप प्रत्येक वेळी नागरिकांकडून करण्यात येतो. अशातच आता नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. नवी मुंबईतील दारावे गावातील ग्रामस्थांनी रायगड भवन येथे सिडको विरोधात निषेध आंदोलन केले आहे. दारावे गावातील ग्रामदेवस्थानाच्या नावे असलेल्या होळी मैदानावर अनधिकृत इमारतीच्या बांधकाम सुरु आहे,असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या बांधाकामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सदर अनधिकृत इमारतीचे बांधकाम निष्कासित करुन मैदान सुरक्षित ठेवण्याच्या मागणीसाठी दारावे येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे. सिडकोने याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.