अंगणवाडी सेविकांचे मानधन रखडल्याच्या आरोपांवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, सेविकांचे मानधन दर महिन्याला वेळच्यावेळी दिलं जातं आणि कोणतंही रखडलेलं नाही.मार्चमध्ये राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. त्यामुळे काही तांत्रिक कारणांमुळे थोडा विलंब होतो, पण असा विलंब सर्वच विभागांमध्ये सामान्य आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. अंगणवाडी सेविकांना वेळेत मानधन मिळावं यासाठी सरकार सतर्क आहे, असंही आदिती तटकरे यांनी नमूद केलं.