मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करताना माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील यांच्यावर तीव्र निशाणा साधला. अलीकडच्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी मोहोळमध्ये सुरू असलेल्या “गुंडागर्दी, मारामाऱ्या आणि भीतीच्या वातावरणा”वर कठोर शब्दांत संताप व्यक्त केला.“मोहोळमध्ये हा काय दहशतवाद चाललाय? लोकांनी निर्भयपणे जगले पाहिजे. तुम्हाला गुंडाराज हवा आहे की विकासराज?” असा थेट सवाल करत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.यावेळी त्यांनी विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली. “नगर विकास विभाग माझ्याकडे आहे. आमदारांनी जेव्हा जेव्हा निधी मागितला तेव्हा ते दिलाच आहे. आणि आपल्या उमेश पाटील यांच्याकडे तर तिजोरीची किल्लीच आहे,” असे म्हणत त्यांनी अजित पवारांवरही हलक्याफुलक्या शैलीत टोमणा मारला.