राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पोषक घटकांची खूप जास्त आवश्यकता असते. कारण वारंवार सर्दी, खोकला, ताप इत्यादी साथीच्या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर पांढऱ्या पेशींवर त्याचे परिणाम दिसू लागतात. अशावेळी आहारात किवी खाणे अतिशय फायद्याचे ठरेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नियमित किवी खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. किंमतीने महाग असलेले किवी फळ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा प्रभावी ठरते. (फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार आजारी पडता? रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित करा किवीचे सेवन

आंबट गोड चवीची किवी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. विटामिन सी असलेल्या फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

किवीमध्ये जीवनसत्त्व इ, फोलेट, पोटॅशियम, फायबर, अँटी ऑक्सिडंट्स आणि वनस्पती-फायटोकेमिकल्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

डेंग्यू किंवा पांढऱ्या पेशी कमी झाल्यानंतर किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. नियमित एक किवी खाल्ल्यास कमी झालेल्या पांढऱ्या पेशी झपाट्याने वाढण्यास मदत होईल.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित एक किवी खाल्ल्यास पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी होण्यासोबतच तुम्ही फिट आणि स्लिम व्हाल.

किवीमध्ये असलेल्या एन्झाइम्समुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी करण्यासाठी किवीचे सेवन करावे. किवीच्या सेवनामुळे त्वचा उजळदार दिसते.






