फोटो सौजन्य - बीसीसीआय़ सोशल मिडिया
India vs South africa 3rd Day : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात फार काही चांगली कामगिरी केली नाही त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात देखील टीम इंडियाच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भरपूर धुतले. आज या सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दोन दिवस फलंदाजी करुन पहिल्या डावामध्ये त्यांनी 489 धावा केल्या आहेत. तर कालपासून भारताचा संघ फलंदाजी करत आहे.
कालच्या शेवट भारताच्या संघाने एकही विकेट न गमावता केला होता पण पहिल्याच सेशनमध्ये भारताने 4 विकेट्स गमावले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात आतापर्यत कशी कामगिरी राहिली यासंर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. या सामन्यामध्ये टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने तिसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर 4 विकेट गमावून आतापर्यत 102 धावा केल्या आहेत.
Tea on Day 3! Yashasvi Jaiswal’s 58(97) takes #TeamIndia to 102/4. Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnrocG#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Ed6wDSWRlg — BCCI (@BCCI) November 24, 2025
या सामन्यात भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती पण पहिल्या सेशन संपायला अर्धा तास शिल्लक असताना भारताच्या संघाने चार विकेट्स गमावले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिल्या डावामध्ये 489 धावा केल्या आहेत. यामध्ये सेनुरन मुथुसामी याने शतक झळकावले तर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जान्सन याने देखील दमदार खेळी खेळली आणि भारताच्या संघाकडून हा सामना दूर करण्याचा प्रयत्न केला. मार्को जान्सन याने संघासाठी 93 धावांची खेळी खेळली.
भारताच्या संघाची या तिसऱ्या दिनी आणखी एकदा निराशाजनक फलंदाजी केली आहे. केएल राहुल याने संघासाठी 22 धावांची खेळी खेळली आणि विकेट गमावली. यशस्वी जयस्वाल याने संघासाठी अर्धशतक झळकावले त्यानंतर त्याला सिमाॅन हॅमोर याने बाहेरचा रस्ता दाखवला. ध्रुव जुरेल याने एकही धाव न करता बाद झाला. साई सुदर्शन याला भारतीय संघामध्ये स्थान मिळाले होते पण तो आणखी एकदा फेल झाला आणि त्याने 15 धावा करुन विकेट गमावली. सध्या भारतीय संघासाठी भारताचा कर्णधार रिषभ पंत आणि रविद्र जडेजा हे दोघे फलंदाजी करत आहेत.






