आजच्या डिजिटल युगात WhatsApp केवळ चॅटिंग,कॉलिंग किंवा स्टेटस अपडेट करण्यासाठीच नाही तर कमाईचे देखील माध्यम बनले आहे. जर काळजीपूर्वक या प्लॅटफॉर्मचा वापर केला तर हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आपल्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. WhatsApp चा वापर करून महिन्याला लाखो रुपये कमवले जाऊ शकतात. याच्याच काही सोप्या पद्धती आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Whatsapp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला बनवेल मालामाल! या 5 पद्धतीने करू शकता तगडी कमाई
जर तुमच्याकडे कोणते प्रोडक्ट किंवा सर्विस असेल तर त्यासाठी तुम्ही WhatsApp Business App द्वारे छोटे ऑनलाईन दुकान सुरु करून चांगली कमाई करू शकता.
Amazon, Flipkart आणि Meesho सारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील प्रोडक्ट्सच्या लिंक तुम्ही तुमच्या WhatsApp ग्रुप किंवा कॉन्टॅक्ट्सना पाठवू शकता. जर त्या लिंकवरून कोणी खरेदी केली तर तुम्हाला कमीशन मिळणार आहे.
कंटेंट रायटिंग, डिझायनिंग, मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट सारख्या फ्रीलान्स सेवा देत असाल, तर WhatsApp हे एक उत्तम प्रमोशनल टूल असू शकते.
जर तुमच्याकडे टेक न्यूज, प्रेरणा, शिक्षण किंवा फॅशन असे विशिष्ट ज्ञान किंवा कौशल्य असेल, तर तुम्ही एक चॅनेल तयार करू शकता आणि याद्वारे देखील तगडी कमाई करू शकता.
जर तुमच्याकडे संवाद कौशल्य असेल तर तुम्ही WhatsApp ग्राहक समर्थन एजंट म्हणून घरून काम करू शकता.