बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) द्वारा १२ ऑक्टोबर २०२५ ला जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज केलेले उमेदवार रविवार, १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेला बसण्यास पात्र असतील. एकूण ५०० पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड केलेले नाही त्यांनी त्वरित ते डाउनलोड करावे. ज्यांच्याकडे हॉल तिकीट नसेल ते परीक्षेला बसू शकणार नाहीत. जनरलिस्ट ऑफिसर भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे आणि परीक्षेचा पॅटर्न काय आहे? चला जाणून घेऊया.
परीक्षेचा पॅटर्न काय आहे?
बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर भरतीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा ही एकूण १५० गुणांची असेल. ज्यात इंग्रजी, तर्क आणि व्यावसायिक ज्ञानाचे प्रश्न असतील. ही परीक्षा २ तास चालणार आहे. या परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे नकारात्मक गुण देखील दिले जातात. १५० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला यशस्वी मानले जाईल आणि मुलाखतीनंतरच निवड केली जाईल.
हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया काय?
बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट – bankofmaharashtra.in वर जा.
होम पेजवर हॉल तिकीट (प्रवेशपत्र) लिंक दिसेल. तिथे क्लीक करा.
तुम्हाला लॉगिन करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
तुमचा नोंदणी क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
त्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
स्क्रीनवर डाउनलोड आणि प्रिंट दोन्ही पर्याय दिसतील.
प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ, नाव आणि रोल नंबरसह इतर माहिती दिसेल.
नियम आगाऊ वाचा आणि अधिक माहितीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
CCL Recruitment 2025: सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडकडून मोठी घोषणा, मेरिटवर होणार निवड; कसे कराल अर्ज?