सातारा नगरपालिकेच्या वतीने राजवाडा जवळच्या जनावरांच्या दवाखाना परिसराचा कायापालट होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली यावेळी त्यांनी.या भागात अद्यावत अशी तीन मजली भव्य इमारत उभारण्यात येणार असल्याचे सांगत आज त्यांनी या भागाची पाहणी केली…या इमारतीमध्ये दुचाकी आणि चार चाकी गाड्यांसाठी भव्य पार्किंग व्यवस्था, राजवाडा चौपाटीवरील खाऊगल्ली साठी 75 गाळ्यांची व्यवस्था याबरोबरच तिसऱ्या मजल्यावर कॅफे अशी सुसज्ज इमारत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या जागेसाठी लागणारी ना हरकत दाखले. याची सर्व पूर्तता करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून पन्नास कोटीच्या निधीची राज्य आणि केंद्र सरकारकडून यासाठी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे यांनी दिली आहे .