कोकाटे यांची रोहित पवारांना नोटीस (फोटो- टीम नवराष्ट्र )
1. माणिकराव कोकाटे यांची रोहित पवारांना मानहानीची नोटीस
2. ऑनलाईन रमी खेळताना कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल
3. त्या प्रकरणात कोकाटे यांच्यावर विरोधकांची जोरदार टीका
राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीच हा व्हिडीओ समोर आणला होता. त्यानंतर आता माजी कृषीमंत्री आणि विद्यमान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान आता यावर रोहित पवारांनी देखील भाष्य केले आहे.
रोहित पवारांचे ट्वीट काय?
माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही.
माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती… pic.twitter.com/jZhq2phiK1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2025
तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल.
ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर कोकाटे चांगलेच वादात सापडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांचा क्लास घेत चांगलीच तंबी दिल्याचे म्हटले जात होते. . त्यामुळे विरोधकांच्या मागणीनंतर व समोर आलेला व्हिडीओ, वादग्रस्त विधाने अशा सर्व गोष्टीनंतर देखील माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यांच्याकडे असलेला कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात अल. तो कारभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आला. तर माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खात्याचा कारभार देण्यात आला आहे. मात्र आता कोकाटे यांनी रोहित पवार यांना नोटीस पाठवल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.