सोलापूर शहर परिसरात गुरुवारी सायंकाळी एका उच्चभ्रू सोसायटीत तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एकाच दोरीला दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे.मृत तरुण रोहित भिमु ठणकेदार, वय 21 वर्ष, राहणार मड्डी वस्ती सोलापूर तर अश्विनी विरेश केसापुरे, वय 23 वर्षे, राहणार शाहीर वस्ती, सोलापूर असे मृत तरुणीचे नाव आहे. कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.