भारतीय बाजारात Renault Kiger Facelift झाली लाँच (फोटो सौजन्य: @SergiusBarretto/ X.com)
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार लाँच होत आहे. बदलत्या काळानुसार अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये नवनवीन कार आणत आहे. मात्र, काही कंपन्या अशा सुद्धा आहेत, जे त्याच्या विद्यमान मॉडेलमध्ये बदल करत असतात. ज्यामुळे कारची लोकप्रियता तर टिकून राहतेच मात्र ग्राहकांना रायडींगचा एक नवा अनुभव मिळतो.
भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना सर्वाधिक मागणी असते. या सेगमेंटमध्ये देशातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या आकर्षक फीचर्स आणि दमदार इंजिनसह आपली मॉडेल्स विक्रीसाठी आणतात. रेनॉनेदेखील या सेगमेंटमध्ये आपली Kiger ही SUV फेसलिफ्ट व्हर्जनसह लाँच केली आहे. या नव्या मॉडेलमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत, त्यामध्ये किती दमदार इंजिन देण्यात आले आहे आणि कोणत्या किमतीत हा मॉडेल सादर करण्यात आला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
फुल्ल टॅंकवर 1200 KM ची रेंज! Maruti Grand Vitara खरेदी करण्यासाठी किती असावा पगार?
रेनॉल्टने भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये किगर ऑफर केली आहे. या एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन रेनॉल्टने 24 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे लाँच केले आहे.
कंपनीने किगर फेसलिफ्टमध्ये अनेक बदल केले आहेत. त्याच्या एक्सटिरिअर आणि इंटिरिअरमध्ये सुद्धा अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी सारखी सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आली आहेत. यासोबतच एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, क्रूझ कंट्रोल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले सारखी फीचर्सही देण्यात आली आहेत.
Honda Elevate Vs Maruti Grand Vitara फीचर्स, मायलेज आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार आहे सुपर बेस्ट?
रेनॉच्या या एसयूव्हीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात आधीप्रमाणेच 1 लिटर क्षमतेचे नॅचरल अॅस्पिरेटेड आणि टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामुळे कारला अंदाजे 72 पीएस व 100 पीएस पॉवर आणि 96 एनएम व 160 एनएम टॉर्क मिळतो. हे इंजिन मॅन्युअल, एएमटी (AMT) आणि सीव्हीटी (CVT) ट्रान्समिशनच्या पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात आले आहे.
रेनॉ काइगर फेसलिफ्ट भारतात 6.29 लाख एक्स-शोरूम किंमतीपासून लाँच करण्यात आली आहे, तर तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.29 लाख रुपये आहे.