विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर अनेक पक्षांत अंतर्गत वाद समोर आले आहेत. महायुतीतील काही आमदारांनी देखील अप्रत्यक्षपणे पक्षातील अंतर्गत हलचालींवर नाराजी दर्शवली होती. मात्र महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही. असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. सजय राऊत यांनी माध्यमांनी दिलेल्या मुलाखतीनुसार, कॉंग्रेस नेते रमेश चेन्नीथला आणि महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे इतर नेते मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. आमच्यात काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यामुळे मविआच्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर जाहीर व्हावी ही सर्वांची भूमिका आहे. दरम्यान यासगळ्याबाबत मविआमध्ये कोणतेही मतभेद नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. सध्या भाजपमध्ये दाऊदशी संबंध असणारे अनेक लोकं आहेत टोला देखील त्यांनी महायुतीला दिला आहे.