असे म्हटले जाते की, तुमचं नशीब जर तुमच्यावर मेहरबान असेल तर मग मग ते धन असो वा संपत्ती, ते तुमच्याकडे येतं किंवा तुमचं नशीब तुम्हाला त्या संपत्तीकडे घेऊन जातं. सध्या याचेच एक उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. सध्या एक अचंबित करणारी गोष्ट एका व्यक्तीसोबत घडून आली आहे, जिथे त्याला चक्क काहीही न करता एक मौल्यवान गोष्ट सापडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती नामिबियाला प्रवासासाठी गेली होती. यावेळी त्याला एका खडकात जे सापडले ते पाहून त्याचे डोळे चमकले कारण ही गोष्ट दुसरी तिसरी कोणती नसून एक रत्न निघाला. यानंतर आता या व्यक्तीचे चांगलेच नशीब उजळल्याचे दिसत आहे. याचा एक व्हिडीओ व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आवाक् झाले आहेत आणि त्याच्या नशिबाची भारी प्रशंसा करत आहेत.
हेदेखील वाचा – विचित्र परंपरा: भारतातील ‘या’ राज्यात मृत्यू झाला तर आनंद अन् बाळ झालं तर शोक व्यक्त केला जातो
व्हायरल व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर दिसते की, एक प्रवासी जो नामिबियाला प्रवासासाठी गेला होता त्याला चक्क एका खाणीत रत्न सापडते. सुरुवातीलाच आपल्याला एक व्यक्ती खडकाचा एक लहान भाग तोडून वेगळे करत असल्याचे दिसते. त्यानंतर हा एक तुकडा बाहेर काढताच त्याला आतमध्ये एक चमकदार जांभळा क्रिस्टल दसतो. हे क्रिस्टल पाहून तो आनंदी होतो. त्याने पोस्टसोबत शेअर करताना माहिती दिली आहे की, ‘ माईनमधून निघालेला हा त्याचा एक पर्सनल पीस आहे, जो नामिबियाला गेल्यावर सापडला.’
या घटनेचा व्हिडिओ @father_son_minerals नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. तसेच हजारो लोकांनी यावर लाइक्स दिले आहेत. याचबरोबर काहींनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही लोकांनी कमेंट्स करत या क्रिस्टलविषयी माहिती शेअर केली आहे. एकाने सांगितले आहे की, हा ॲमेथिस्ट स्टोन म्हणजेच जमुनिया रत्न आहे. तर काही लोकांनी याला स्क्रिप्टेड म्हटले आणि सांगितले की त्या व्यक्तीचे नशीब खूप चांगले आहे.