बापरे! व्यक्तीने बाईकच्या पेट्रोल टाकीत फटका टाकून पेटवला अन् मग जे झालं... धक्कादायक Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक नको ते सर्व करू पाहतात. कधी ते आपल्याला जीवघेणे स्टंट करताना दिसतात तर कधी विचित्र गोष्टी करताना दिसून येतात. सध्या असाच एक गोधळून टाकणारा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती चक्क एका बाईकला उध्वस्त करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. पुढे जे तो करतो, ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या बाईकच्या पेट्रोल टाकीत फटाके टाकत असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोलची टाकी बघून बाईक बरीच जुनी असावी असे वाटते. टाकीत फटाका टाकल्यानंतर तो व्यक्ती असे काही तरी करून बसतो की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तर हा व्यक्ती पुढे गाडीच्या पेट्रोल टाकीत टाकलेला फटका चक्क पेटवतो आणि काही अंतरावर जाऊन उभा राहतो.
हेदेखील वाचा – काका ऑन फायर! डोक्यावर ठेवला जळता फटाका अन् शेवटी… Viral Video पाहून तुम्हीही हैराण व्हाल
काही वेळाने शेवटी नको तेच घडून बसते आणि हा फटाका जोरदार फुटतो. यामुळे बाईकची पेट्रोल टाकी आणि सीट यांचा चक्काचूर होऊन ते हवेत जोरदार उडून दूर जमिनीवर पडतात. हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही मात्र सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. बाईकचा झालेला चक्काचूर पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.
शाबाश बेटा 😆 😂
अपनी बाइक की पेट्रोल की टंकी में सुतली बम डालकर जला दिया, आगे देखो अब क्या हुआ pic.twitter.com/cD3tx6ooII— Nisha (@y_iamcrazyy) October 28, 2024
हेदेखील वाचा – अद्भुत-अविश्वसनीय! मगर हरणाला खाणार तितक्यात घडलं असं काही, उलटे पाय करून पळू लागली मगर, Video Viral
हा धक्कादायक व्हिडिओ @y_iamcrazyy नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘शाब्बास बेटा आपल्या बाईकच्या पेट्रोल टाकीत सुतळी बॉम्ब टाकून जाळून टाकले, पुढे काय झाले ते पहा’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मोटारसायकलच्या टाकीचा निचरा करण्याचा एक चांगला मार्ग सापडला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाईकमध्ये पेट्रोल टाकायला आहे होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.