सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी निगडित काही व्हिडिओजचा देखील समावेश असतो. प्राण्यांच्या आयुष्याशी निगडित हे व्हिडिओज पाहायला लोकांना फार आवडते. लोक मजा घेत घेत असे व्हिडिओ पाहतात आणि याच कारणामुळे ते सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मगरीच्या हल्ल्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मगर हा पाण्याचा सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. एकदा का शिकार त्याच्या रडारखाली आला की पळून जाणे अवघड होऊन बसते पण तुम्ही कधी अशी मगर पाहिली आहे का जी शिकार पकडल्यानंतर त्याला जिवंत सोडते? अजिबात नाही तर याच्याशी संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये मगरीने हरणाला शिकारीसाठी पकडले मात्र काही वेळाने त्याने असा धक्कादायक प्रकार केला की ते पाहून सगळेच अवाक् झाले.
हेदेखील वाचा – इतक्या जवळून मरण बघितलंय का कधी? घराच्या बाहेर येताच घडलं असं काही… धडकी भरवणारा Video Viral
काय घडले?
वन्य प्राण्याशी संबंधित व्हिडीओ पाहिल्यावर भक्षक मगर भक्ष्याच्या शोधात तिथे फिरत असल्याचे दिसून येते. तेव्हा त्याची नजर हरिणावर पडली आणि मगरीने तिची शिकार करण्यासाठी सापळा रचला. काही वेळातच मगर हरणाजवळ आली आणि त्याने त्याला जबड्यात पकडले. पाण्याचा राक्षस मगर हरणाला चावत मारणार होता, तेवढ्यात मगर अचानक हरणाला आपल्या जबड्यातून मुक्त करते आणि हरीण पळून निघून जाते. खरं तर, व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात असा दावा करण्यात आला आहे की, मगरीने हरणाला पकडताच ती गर्भवती असल्याचे समजले. अशा स्थितीत त्याने हरणाला काही सेकंद जबड्यात धरून मग मुक्त केले. व्हिडीओमध्ये पुढे बघायला मिळतं की, नवीन जीवन मिळताच हरण ताबडतोब जंगलाच्या दिशेने धावते.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @ajaychauhan41 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अप्रतिम निसर्ग, हरीण गरोदर असल्याचे मगरीला समजताच मगरीने लगेच हरण सोडले. लक्षात ठेवा…वन्य प्राणी कधीच कुणाला मारत नाहीत आणि चवीसाठी खात नाहीत, ते भूक भागवण्यासाठी खातात. निसर्गाच्या या नियमाला फक्त एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे माणूस.”
अद्भुत प्रकृति
मगर को जैसे ही पता चला कि हिरण प्रेग्नेंट है, मगर ने उस हिरण को तुरंत छोड़ दिया।
ध्यान रहे…जंगली जानवर कभी स्वाद के लिए किसी को मारकर नहीं खाते, वो भूख मिटाने के लिए खाते है।
प्रकृति के इस नियम का एक ही अपवाद है और वो है मनुष्य। pic.twitter.com/NzIwjaZm4O— हम लोग We The People 🇮🇳 (@ajaychauhan41) March 17, 2023
हेदेखील वाचा – बॉईज हॉस्टेलवर पडला छापा, खोलीची घेतली झडती अन् पलंगातून निघाली अशी वस्तू… Viral Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मानवाला जर बाजूला ठेवले तर कदाचित या विश्वातील कोणत्याही सजीवाने आपला स्वभाव बदललेला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटते की मगर स्वतः गर्भवती आहे. तिने फक्त सहानुभूती दाखवली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.