जर एखादं लहान मूल वयोमानानं खूप लवकर पूर्ण आणि गुंतागुंतीची वाक्ये स्वतः तयार करून बोलू लागलं तर ते ‘प्रगत भाषा’ क्षमतेचं लक्षण असू शकते. University of Edinburgh तील संशोधन असं सांगतात की ज्या मुलांमध्ये लहान वयात प्रगत भाषा कौशल्ये विकसित होतात त्यांच्या आयुष्यात नंतरच्या काळात बौद्धिक क्षमता जास्त असण्याची शक्यता वाढते. या मुलांना व्याकरण आणि वाक्य रचना चांगली समजते. त्यामुळे त्याचा फायदा पुढे प्रभावीपणे भाषा बोलण्यात होतो.
तुमच्या मुलाला डायनासोर, ग्रह किंवा यंत्रे अशा विषयांमध्ये रस घेतो का? किंवा त्याबाबतच्या गोष्टी जाणून घेण्याबाबत उत्सुकता असते का? या मुद्द्यावर National Association for Gifted Children यांनी स्पष्ट केलंय की, अनेक विषयांमध्ये खोल आणि व्यापक रस असणे हे प्रतिभावानतेचं लक्षण असू शकतं. अशी मुल् एखाद्या विषयाबद्दलच्या वरवरच्या ज्ञानाने समाधानी नसतात, तर त्याऐवजी सखोल समजून घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना एखाद्या गोष्टीबाबत सतत कुतुहल असतं आणि त्यांना त्या गोष्टीबाबत सतत सविस्तर जाणून घ्यायचं असतं.
जी मुले नवीन गोष्टी तयार करतात, नवीन खेळ शोधतात किंवा समस्यांवर अनोखे उपाय शोधतात त्यांची रचनात्मकता विचारसरणी मजबूत असते. American Psychological Associationच्या अहवालानुसार, रचनात्मकता थेट कॉग्निटिव एबिलिटी क्षमतेशी जोडलेली असते. अशी मुले परंपरागत चालत आलेल्या विचारसारणीला तोडून नवीन कल्पना घेऊन येतात.
जर तुमच्या मुलाला एखादे नवीन कौशल्य किंवा संकल्पना खूप कमी पुनरावृत्तीशिवाय समजली तर ते त्यांची लवकर शिकण्याची क्षमता दर्शवते. University of Sussexच्या एका अभ्यासात असं दिसून आलं की जी मुलं नवीन कल्पना लवकर आत्मसात करतात त्यांचा आयक्यू स्कोअर नंतरच्या आयुष्यात जास्त असण्याची शक्यता असते. ते शिकलेल्या गोष्टी वेगवेगळ्या परिस्थितीत लागू करण्यास देखील सक्षम असतात.
प्रत्येक गोष्टीबद्दल ‘का’ असे विचारणं कधीकधी पालकांना कंटाळवू शकतं, परंतु ही सवय तीक्ष्ण नजरेचं, विचाराचं लक्षणही असू शकतं. Carnegie Foundation for the Advancement of Teaching च्या संशोधनानुसार, नैसर्गिकरित्या जिज्ञासू मुलं चांगली क्रिटिकल थिंकिंग विचारसरणी विकसित करतात आणि त्यांची शिकण्याची क्षमता जास्त असते.
याव्यतिरिक्त, जर एखाद्या मुलाने दीर्घकाळ एखाद्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर ते त्यांची एकाग्रता आणि मानसिक स्थिरता दर्शवते. असे मानले जाते की ही खोल एकाग्रतेनंतर ज्ञान विकसित करण्यास मदत होते.






