(फोटो सौजन्य: Instagram)
बिबट्याला जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानले जाते. आपल्या प्रचंड वेगाने तो क्षणातच प्राण्यांंची शिकार करतो. अशात बिबट्याच्या वाटेला जाण्याची घोडचूक कुणीही करत नाही. मात्र नुकताच सोशल मिडियावर एक अनोखे दृश्य दाखवण्यात आले ज्यात काही लोक बिबट्याला पकडून त्याला कुठेतरी घेऊन जाताना दिसून दिले. बिबट्याची अवस्था यात थोडे बिघडल्याचे दिसले आणि त्याच्या याच अवस्थेवर बाकीचे लोक हसताना दिसले. खरंतर, यावेळी बिबट्याने पाणी समजून हातभट्टी म्हणजेच दारू प्यायल्याचे सांगण्यात आले. दारु पिल्यामुळे त्याची अशी अवस्था झाल्याचे यात सांगण्यात आले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
नेमकं काय प्रकरण आहे?
हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या एका गावातील आहे. व्हडिओमध्ये एक बिबट्या थकलेल्या अवस्थेत हळूहळू पुढे चालत असल्याचे दिसून येते. यावेळी त्याच्या भोवती लोकांची गर्दीही दिसून येते. त्याची ही अवस्था पाहून त्याने मद्यपान केल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. मात्र तपासामध्ये असे आढळून आले आहे की, हा दावा दिशाभूल करणारा आहे. खरंतर, व्हिडिओतील हा बिबट्या मद्यधुंद नसून आजारी आहे. बिबट्याला असे फिरताना पाहून लोकांनी त्याच्याभोवती एकच घोळका घातला आणि त्याचे फोटो, व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची सुटका केली आणि त्याला उपचारासाठी भोपाळमधील प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले. मात्र त्याचा हा व्हिडिओ आता चुकीच्या दाव्यासह सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
बिबट्याचा हा व्हायरल व्हिडिओ @aapla_chaufula नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “परिस्थिती थोडीशी खराब असली का औकात नसलेले सुद्धा टिंगल करतात” तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, “बाकीचे कार्यकर्ते काय चकना घेऊन चाललेत काय” आणखीन एका यूजरने लिहिले आहे, “जेव्हा तो त्याच खर रूप दाखवेल, तेव्हा एक पण व्यक्ती उद्याचा दिवस बघू शकणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.