माणसाचे जसजसे वय वाढू लागते तसतसे त्याचा उत्साह आणि शक्ती कमी होऊ लागते. तारुण्यात करता येणाऱ्या बऱ्याच गोष्टी वृद्धत्वात करता येत नाहीत. शरीर थकणे, विविध प्रकारचे आजार अशा समस्या उद्भवू लागतात. मात्र आपण जर तारुण्यात बरोबर व्यायाम केला आणि आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी राखली तर वृद्धत्वातही आपले स्वस्थ मजबूत आणि उत्साही राहू शकते. याचीच प्रचिती देणारा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थक्क करून टाकेल.
सध्या व्हायरल होत असेल्या व्हिडिओत एक आजोबा जबरदस्त क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यांना पाहून त्यांचे वय 60 च्या वर असल्याचा अंदाज येतो. मात्र त्यांच्या उत्साह तरुणांना लाजवण्यासारखा आहे. त्यांची करारी बॅटिंग पाहता यासमोर धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही फिका पडल्यासारखा वाटत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत तसेच आजोबांच्या या बॅटिंगचे दार कौतुक करत आहेत.
हेदेखील वाचा – काटेरी जीभ बाहेर काढताना दिसला एक भयावह जीव, Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल
माहितीनुसार, हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेतील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता आजोबा एका मागून एक दोन गगनचुंबी षटकार मारतात. ते ज्या ताकदीने बॅटिंग करत आहेत ते पाहून बॉलर देखील अवाक् झाल्याचे दिसून येत आहे. खेळातील आजोबांचा उत्साह प्रशंसनीय आहे.
View this post on Instagram
A post shared by official UP Tennis Cricket (@official_up_tennis_cricket)
हेदेखील वाचा – शौक बडी चीज है! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून नवऱ्याने संपूर्ण बेटच खरेदी केलं, किंमत ऐकून आवाक् व्हाल
हा व्हायरल व्हिडिओ @official_up_tennis_cricket नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 6 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिल्या आहेत. तर 79 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच काहींनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे आजोबा आपल्या जमान्यात कपिल देव असतील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे तर धोनी पेक्षाही खतरनाक बॅटिंग करताहेत.”