Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

School Viral Video : शिक्षकांच्या बदलीवर भावूक झाले अन् शाळेतच प्रवेशद्वार अडवत विद्यार्थ्यांनी दर्शवला विरोध. व्हिडिओमध्ये आपल्या आवडत्या सरांना रोखण्यासाठी मुलांची मोठी गर्दी दिसून येते तर काहींच्या डोळ्यातून यावेळी अश्रूंच्या धारा देखील वाहत असतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2026 | 09:12 AM
'सर आम्हाला सोडून जाऊ नका...'; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

'सर आम्हाला सोडून जाऊ नका...'; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकाच्या बदलीने विद्यार्थी भावूक
  • लाडक्या गुरुजींसाठी विद्यार्थ्यांचा विरोध
  • शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्याचा भावूक व्हिडिओ
शिक्षक दिनीनिमित्त विद्यार्थी शिक्षकांना भेटवस्तू देतात आणि गुरु म्हणून त्यांचे आभार मानतात. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते हे फक्त क्लासरुम, होमवर्क आणि पुस्तकांपर्यंत मर्यादित राहत नाही तर शिक्षक हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असतो. जगात आपल्याला यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी शिक्षकांचा मोठा वाटा असतो. अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक असा भाग बनून जातात ज्यातून वेगळं होणं त्यांना फार कठिण जातं. शिक्षक दिनानिमित्त सोशल मिडियावर एक भावूक करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात शाळेतील शिक्षकांच्या ट्रान्सफरवर मुलं ढसाढसा रडताना दिसून आले. आपले शिक्षक आपल्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत याचे दु:ख मुलांना सहन झाले नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहू लागल्या.

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेली ही घटना अमरावती शहरात घडल्याची माहिती आहे. व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, विद्यार्थी त्यांचे लाडके शिक्षक, पवन सुरजुसे यांच्या बदलीचा निषेध करण्यासाठी एकत्र आले होते. त्यांनी शिक्षकांच्या भोवती आणि शाळेच्या प्रवेशद्वारावरही जमून त्यांच्या बदलीला तीव्र विरोध दर्शवला. विद्यार्थ्यांचे अशाप्रकारे एकत्र उभे राहणे हे दर्शवते की, त्यांच्यासाठी ते केवळ पाठ्यपुस्तकातून धडे शिकवणारे शिक्षक नव्हते तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांशी एक घट्ट भावनिक नाते निर्माण केले होते.

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

व्हिडिओमध्ये विद्यार्थी फारच भावूक होताना दिसून आले. ही घटना दाखवून देते की, एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात कशी आपली जागा निर्माण करुन जातो. घटनेचा व्हिडिओ @moneycontrol.com नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने या घटनेवर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत मांडले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “तुम्ही खूप नशीबवाण आहात सर”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शिक्षकांनी या गुरुजींकडून शिकायला हव, ती मुलं आहेत, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांना प्रेमाने शिकवा, मुलं आपल्या रंगहीन आयुष्यात रंग भरतात”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “यालाच खरा सुपरहिरो म्हणतात”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Amravati teacher transfer students emotional video teacher student bond

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • amravati
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
1

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
2

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
3

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.