(फोटो सौजन्य: anchor_monika_jaju)
उखाणा घेणे हा महाराष्ट्राच्या संस्कतीचा एक भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी, कोणत्या कार्यक्रमात किंवा लग्नसमारंभात जोडप्यांना आपल्या नवरा-बायकोसाठी उखाणा घेण्यास सांगितला जातो. आपले प्रेम दर्शविण्याचा हा एक सांस्कृतिक मार्ग आहे असे आपण म्हणू शकतो. अनेकदा हे उखाणे फार मजेशीर रित्या घेतले जातात, ज्यांना ऐकताच आपल्याला हसू येईल. याचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर होत असतात. सध्या अशाच एका मजेशीर उखाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उखाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजोबा आपल्या पत्नीसाठी म्हणजेच आजींसाठी एक हटके उखाणा म्हणताना दिसून येत आहेत. हा भन्नाट उखाणा ऐकून आता अनेकांना हसू अनावर झाले आहे. हे आजोबा पंढरपूरचे आहेत. एका कार्यक्रमात त्यांना उखाणा घेण्यास सांगण्यात आला. त्यांचा उखाणा ऐकून उपस्थित लोकांनाच काय तर युजर्सनाही हसू आवरत नाहीये. आजोबांनी आपल्या उखाण्यात नक्की असे काय म्हटले ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – किंग कोब्राने ओकले एकामागून एक 3 साप, रस्त्यावरील भयाण दृश्य पाहून सर्वच झाले थक्क, Video Viral
व्हायरल व्हिडिओ पाहताच समजते की हा एक सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडिओ आहे. यात आजोबा आपल्या हातात माइक धरून उभे असल्याचे दिसून येते. ते यावेळी त्यांच्या पत्नीसाठी एक मजेशीर उखाणा घेत असतात. उखाण्यात ते म्हणतात,
“मी शंकर यशवंत कवडे
गाव हाय गुरसाळं
पंढरपूर तालुका आण सोलापूर जिल्हा
आण पारबतीचं (पार्वतीचं) नाव घेतो हिल पोरी हिला”
आजोबांचा हा उखाणा ऐकताच सर्वांना हसू फुटते. अनोख्या रीतीने घेतलेल्या या उखाण्यात त्यांनी आपला संपूर्ण परिचय दिला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील एका गुरसाळे गावचे रहिवासी असल्याचे त्यांनी यात सांगितले आहे. आजोबांचा हा मजेशीर उखाणा आता अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
A post shared by Anchor Monika Jaju (Monicka Jaaju) (@anchor_monika_jaju)
हेदेखील वाचा – मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! स्कुटरवर आला हृदयविकाराचा झटका तितक्यात देवदूत … धकाकदायक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @anchor_monika_jaju नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आजोबांच्या या उखाण्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नाद केला पण वाया नाही गेला धन्य आहे आजोबा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजोबा आता असे आहेत तर जवानीत कसे असतील बुवा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एक नंबर आजोबा उखाणा घेतलास तुम्ही…”