(फोटो सौजन्य: Instagram)
कोण आहे २१ पत्नींचा हा व्यक्ती?
सोशल मिडियावर व्हायरल होणारा हा व्यक्ती बांग्लादेशाचा रहिवाशी असून त्याचे नाव मेरू मियां(Meru Mia) असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे ३५ वर्षे असून त्याला एकूण २१ महिलांसोबत त्याने विवाह केला आहे. मेरु मियाने सांगितले की, त्याने आतापर्यंत २१ वेळा लग्न केले आहे. त्याचे कमाईचे साधन भीक मागणे आहे, यातूनच तो आपल्या कुटुंबाचे पोट भरतो.
इतके विवाह केले कसे?
आता सर्व मोठा प्रश्न पडतो की, भिकाऱ्याने इतके लग्न केले कसे? व्हायरल व्हिडिओत त्याने या प्रश्नाचे उत्तर सर्वांसोबत शेअर केले आहे. मेरु मियाचा दावा आहे की, त्याने कधीच कोणत्या महिलेला लग्नाची मागणी घातली नाही. त्याच्या मते, महिलांनीच त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला त्याला त्यांचे मन मोडायचे नव्हते. यामुळेच एकाही महिलेला नकार न देता त्याने तब्बल २१ महिलांसोबत लग्नगाठ बांधली. तथापि, या दाव्याची स्वतंत्र पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
दररोज वेगवेगळ्या पत्नीसोबत जातो भीक मागायला…
व्हिडिओतील दाव्यानुसार, भीक मागून तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या या कामात त्याला २१ बायकांचीही मदत होते. मिरु रोज एका बायकोला आपल्यासोबत भिक मागायला घेऊन जातो. म्हणजेच दरदिवशी त्याच्यासोबत एक वेगळी पत्नी भिक मागायला जाते. बांग्लादेशी भिकाऱ्याची ही कहाणी आता सोशल मिडियावर सर्वांनाच थक्क करत असून यूजर्सने यावर आपले आश्चर्यही व्यक्त केले आहे. याचा व्हिडिओ @theverity.bd नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या जीवघेण्या प्रवासावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “त्याला फक्त त्याच्या ८ फेव्हरेट बायकांची नावे लक्षात आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इथे तरुणांना एक मिळत नाही आणि भिकाऱ्याला इतक्या बायका कशा मिळाल्या?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भाऊ स्वत:ला जेम्स बाॅंड समजत आहे”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






