Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO : राजीनामा द्या, नाहीतर… जंतर-मंतरवर पोहचली ७ वर्षांची चिमुकली, पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीचे आंदोलन सुरु असून मागील १६ दिवसांपासून इथे सोनम वांगचूक आमरण उपोषण करत आहेत. उपोषणाचे अनेक व्हिडिओज समोर येत असतानाच ७ वर्षांच्या चिमुकलीच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही अशा भाषेत तिने आपले मत मांडले आणि सरकारकडे एक खास मागणी केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 01:31 PM
VIDEO : राजीनामा द्या, नाहीतर... जंतर-मंतरवर पोहचली ७ वर्षांची चिमुकली, पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधानांकडे केली 'ही' मागणी

VIDEO : राजीनामा द्या, नाहीतर... जंतर-मंतरवर पोहचली ७ वर्षांची चिमुकली, पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधानांकडे केली 'ही' मागणी

Follow Us
Follow Us:
  • जंतर-मंतरवरील उपोषणात ७ वर्षांच्या चिमुरडीचा व्हिडिओ व्हायरल.
  • पत्रकाराशी संवादात चिमुरडीची ठाम भूमिका चर्चेत.
  • सोनम वांगचुक यांची प्रकृती ढासळळी.
दिल्लीतील जंतर-मंतरवर मागील १७ दिवसांपासून काॅकरोज जनता पार्टीचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर समोर येत असतानाच अलिकडे एका खास व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओमध्ये एक ७ वर्षांची चिमुकली काॅकरोच पार्टाच्या उपोषणात समील होताना दिसली. ती फक्त या उपोषणात सामील झाली नाही तर तिने पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे खास मागणीही केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. इतक्या कमी वयातही देशात सुरु असलेल्या सर्वात मोठ्या उपोषणाला चिमुकलीने हजेरी लावली आणि सडेतोडपणे आपले मत लोकांसमोर मांडले. तिचा हाच समजूतदारपणा आता लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान पंतप्रधान आणि शिक्षणमंत्र्यांकडे चिमुरडीने काय मागणी केली ते चला जाणून घेऊया.

पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडलं अन् पत्नीने केला हाय व्होल्टेज ड्रामा, एकामागून एक कानशिलात हाणली… Video Viral

काय होती चिमुरडीची मागणी?ko

काॅकरोच जनता पार्टीच्या उपोषणात सामील झालेल्या चिमुरडीला पाहून एका पत्रकाराने तिच्याशी संपर्क साधू पाहिला. त्याने मुलीला विचारले की, तिची काय मागणी आहे? याच्या उत्तरात चिमुकलीने सांगितले की, मला धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान मोदी यांना सांगायचे आहे की, मी तुम्हाला दोन पर्याय देते. एकतर तुम्ही राजीनामा द्या आणि माफी मागू नका. किंवा तुम्ही इथे मंचावर या आणि माफी मागा, पण राजीनामा देऊ नका.” यानंतर पत्रकार मुलीला म्हणतो की, “तू लवकरच पाॅप्यूलर होणार आहेस. यावर चिमुकली उत्तर देत म्हणते की, हा माझा पहिला व्हिडिओ नाहीये, याआधी मी चार व्हिडिओ बनवले आहेत”.

तुम्हाला जराही लाज नाही…

व्हिडिओत मुलगी पुढे म्हणते की, “मी धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छते की, तुम्हाला जराही लाज वाटत नाही. भारताचे इतके मोठे शास्त्रज्ञ आजारी पडलेत. मागील १६ दिवसांपासून ते इथे आहेत”. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मागील १७ दिवसांपासून सोनम वांगचुक जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून अद्याप मोदी किंवा शिक्षणमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. नीट पेपरलीक प्रकरणानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काॅकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके देखील आपल्या टीमसह जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत.

7-YEAR-OLD PRACHI GIVES MODI AND PRADHAN TWO OPTIONS 🚨 ABHINAV: What do you want to say? PRACHI: Modi ji and Dharmendra Pradhan ji, you have two choices. Resign without saying sorry, or come to this stage and say sorry without resigning. ABHINAV: Why did you come here?… pic.twitter.com/svSI0xyWV0 — Mr Sharma (@sharma_views) July 14, 2026

स्पेसमधून कशी दिसते पृथ्वी? प्रकाश आणि चंद्राचा लपंडाल… अद्भूत दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

प्रकृती सातत्याने ढासळत चालली आहे…

आज मंगळवार १५ जून २०२६ रोजी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या १७ वा दिवस सुरु झाला आहे. या उपोषणामुळे त्यांचे वजन बरेच कमी झाले असून प्रकृतीही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सीजेपीनुसार, त्यांचे वजन ८.२ किलोग्रॅम कमी झाले आहे. अभिजीत दीपकेने सोशल मिडियावर त्यांच्या प्रकृतीची माहिती देत सांगितलं की, त्यांचे स्नायू कमकुवत होत असून ते अत्यंत वेदनादायी परिस्थितीत आहेत. अन्य सर्वांप्रमाणेच मी देखील त्यांना उपोषण संपवण्याचे आवाहन केले. पण त्यांनी शांतीपूर्वक उत्तर देत म्हटले की, उपोषण संपवायला सांगू नको तर सरकारला विचार की त्यांना संभाषण का करायचं नाहीये.

Web Title: Cjp protest 7 year old girl video goes viral jantar mantar sonam wangchuk hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Protest
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
1

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू
2

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी
3

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट
4

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.