Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी

Shocking Viral Video : क्षुल्लक व्हूज आणि रिल्ससाठी डाॅल्फीन माशाला सायकलला बांधलं आणि फरफटत रस्त्यावरुन नेलं. या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2026 | 01:52 PM
रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी

रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • रीलसाठी धक्कादायक कृत्य
  • व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
  • संबंधितांवर कारवाईची मागणी
सोशल मिडियावर व्हायरल होण्याच्या नादात लोक अनेकदा नको ते प्रकार करताना पाहायला मिळतात. व्हायरल होण्यासाठी कधी कुणी स्वत:चा जीव धोक्यात घालतो तर कधी कुणी इतरांचा जीव धोक्यात घालतो. रील बनवणं एक ट्रेंड बनत असलं तरी आपण काय वागत आहोत याचे आपल्याला भान असायला हवे. अलिकडे सोशल मिडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात व्यक्तीने रील बनवण्यासाठी डाॅल्फिन माशाचा जीव धोक्यात घातल्याचे दिसले. व्हिडिओत डाॅफ्लिनला पाण्यातून पकडल्यानंतर सायकलला बांधून तो घरी आणताना दिसला. पाण्यातून बाहेर असेलेली ही डाॅल्फिन जिवंत राहण्यासाठी तडफडत असते पण क्षुल्लक रीलसाठी व्यक्ती तिच्या जीवाची गय करत नाही आणि क्रुरपणे तिला सायकलला बांधून ठेवतो.

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने

हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, डाॅल्फिन हा मासा काही साधा मासा नाही. जगभरात फार कमी ठिकाणी डाॅल्फिन दिसून येते. अशात माशाची शिकार करण्याऐवजी आपण त्याचे संरक्षण करायला हवे. व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, हा डॉल्फिन बंगाल टायगर, आशियाई हत्ती, आशियाई सिंह किंवा लाल पांडा यांच्याइतकाच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पण तरीही व्हिडिओतील काही लोक त्याच्यावर अत्याचार करताना दिसून आले.

This dolphin is as endangered as the Bengal tiger, Asian elephant, Asiatic lion, or the Red panda, yet these idiots are proudly displaying their catch. India needs to fix this. pic.twitter.com/K9DeUp3w5G — Nick Plumb (@PlumbNick) August 25, 2026

रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral

ही घटना बिहारमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक यूजर्सने बिहार पोलीस, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि पर्यावरण संघटनांना टॅग करुन या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी या घटनेवर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मतही व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “ते डाॅल्फीनला मारणार आहेत का? की तिला खाऊन टाकणार आहेत? त्यांना नक्की त्याच्यासोबत काय करायचं आहे?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरंच खूप निराशाजनक आहे की कोणालाही याची पर्वा नाही. डॉल्फिन हे अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील प्राणी आहेत, ज्यांना वेदना, भीती, आनंद जाणवतो आणि त्यांची स्वतःची एक प्रबळ जाणीव असते. त्यांच्या आत कोणीतरी दुःख भोगत आहे आणि लोक त्यांना फक्त ‘एक प्राणी’ म्हणून पाहतात”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला वाटतं त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Dolphin tied to bicycle for reels bihar video viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • dolphin
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने
1

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने

रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral
2

रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
3

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral
4

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.