(फोटो सौजन्य: instagram)
वन्य प्राण्यांच्या लढ्याशी संबंधित दररोज सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असते. अशा व्हिडिओंमध्ये सिंह, हत्ती, मगरी आणि इतर वन्य प्राण्यांमधील संघर्ष दाखवण्यात येतो. लोक फार उत्सुकतेने हे असे व्हिडिओज पाहत असतात ज्यामुळे ते व्हायरल होतात. आताही इथे एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हत्ती आणि मगरी यांच्यातील धक्कादायक चकमक पाहायला मिळत आहे. हत्ती पाणी पिण्यासाठी नदीजवळ येतो तेव्हा मगरीने त्याची सोंड पकडल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यांनातर हत्ती मगरीला असा धडा शिकवतो की सर्वजण पाहतच राहतात. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मगरीने हत्तीची सोंड पकडताच हत्तीने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. सुरुवातीला असे दिसते की मगरीने पकडलेल्या सोंडेतून सुटण्यासाठी हत्तीला संघर्ष करावा लागला. मात्र, तो लवकरच आपली ताकद वापरतो आणि मगरीला पूर्ण ताकदीने ढकलतो. यानंतर, हत्ती आपले वजनदार शरीर मगरीच्या वर दाबतो आणि मगरीला पायदळी तुडवतो. यामुळे मगरीला खूप त्रास होतो आणि तिला मुक्त करण्याचा कोणताही मार्ग मिळत नाही. या क्षणी हत्तीची ताकद आणि राग स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
रेल्वे स्टेशनवरच पत्नीने पतीला केली मारहाण, एका फटक्यात उचलले आणि जमीवरच नेऊन आपटले; Video Viral
मगरीला पाण्याचा राक्षस मानले जाते, फार चपळतेने मगर आपल्या शिकाऱ्यावर निशाणा साधते आणि त्याला आपल्या जाळ्यात अडकवते. मात्र हत्तीसमोर मगरीची झालेली हार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. तसेच काहीजण गराजाच्या शक्तीची प्रशंसा करत आहेत. प्राण्यांच्या जीवनात लढतीचे असे अनेक प्रसंग येत असतात ज्यात कोणी हारतं तर कोणी विजयी ठरतं. मगर हत्तीमधील ही थरारक लढत मात्र आता अनेकांना आश्चर्यचकित करत आहेत. लढतीचा हा थरार आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @noughty_flix नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘कोण म्हटल मगरीचे अश्रु खोटे असतात’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत गजराजाच्या प्रतिउत्तरावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “भावाला त्याची ताकद माहिती आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता मगर हत्तीशी कधीही पंगा घेणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.