लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक
सकाळी उठल्यानंतर लहान मुलांसह मोठ्यांना नाश्त्यात काय खावे? सुचत नाही. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. लहान मुलांना पॅनकेक खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. नाश्त्यामध्ये विकत मिळणाऱ्या तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






