निष्काळजीपणा नडला! खिडकीतून बिबट्याला न्याहाळत होता चिमुकला इतक्यात...; पुढे जे घडलं भयावह, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. पर्यटकांची एक चूक त्यांना महागात पडली आहे. सफारी करताना पर्यटकांनी गाडीची खिडकी उघडी ठेवली. शिवाय बिबट्या जवळ असताना गाडी थांबवली यामुळे गंभीर दुर्घटना घडील आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये बिबट्याने एका 13 वर्षाच्या चिमुल्यावर हल्ला केला आहे. ही घटना बेंगळुरूच्याबन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क मध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे. 16 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यावेळी पर्यटकांनी सफारी करताना गाडीची खिडकी उघडली होती. यावेळी 13 वर्षाचा चिमुकला गाडीतून बाहेर डोकावून पाहत होता. याच वेळी गाडीच्या बाजूने एक बिबट्या जात होता. बिबट्याला गाडीची खिडकी उघडी दिसताच उड्या मारु लागला.
यावेळी त्याने 13 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या हातावर बिबट्याने वार केला असून गंभीर जखमी झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कर्नाटक राज्य पर्यटन विकास संस्थेचे एक वाहन सफारी साठी बन्नरघट्टाच्या राष्ट्रीय उद्यानात गेले होते. यावेळी जंगली सफारीचा आनंद घेताना ही घटना घडली.
एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL
🚨Bengaluru | A minor sustained injuries after a leopard attack inside Bannerghatta National Park during a safari ride today.
Park authorities provided first aid and shifted him to hospital. He has since been discharged. pic.twitter.com/GN8WD9tnmi
— Backchod Indian (@IndianBackchod) August 16, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @IndianBackchod या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करण्यात आला असून त्याच्या प्रकृती स्थिर आहे. अनेक नेटकऱ्यांनी पर्यटकांना निष्काळजीपणा नडल्याचे म्हटले आहे. जंगल सफारी करताना खिडकी उघडी ठेवणे बिबट्याला, सिंहाला , वाघाला चिथावणी देण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांनी उद्यानाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.