फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत राहतात, पण कधी कधी असे काही दिसते की आपण ते पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही. कधी असे व्हिडीओतून काहीतरी नवीन पाहायला मिळते तर कधी ते असे असतात की ते पाहून हसू आवरत नाही. काही व्हिडिओ पाहताना आपण विचार करायला लागतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बऱ्याचदा तुम्ही पाहाल की अशिक्षित लोक देखील अनुभवाने सुशिक्षित लोकांसारखे संवाद साधू शकतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रिक्षाचालक एका परदेशी जोडप्याला दिल्लीत काय करू शकतो हे समजावून सांगत आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे इंग्लिश जोडपं रिक्षा चालकाचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकत आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
हे देखील वाचा- आश्चर्य! ‘माझा नवरा माणूस नाही… जिन आहे’; भूताशी लग्न केल्याचा महिलेचा दावा
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सायकल रिक्षाचालक मजेशीर इंग्रजी बोलत आहेत, दिल्लीच्या रस्त्यावर एक रिक्षाचालक इंग्रजी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या रिक्षात एक ब्रिटीश जोडप्याला त्याने बसवले आहे. रिक्षाचालक त्यांना ते दिल्लीमध्ये काय करू शकतात ते सांगत आहेत. तो त्यांना दिल्लीतील काही ठिकाणांबद्दल सांगत आहे. त्याच्या इंग्रजीत व्याकरण नाही पण तो ज्या आत्मविश्वासाने बोलतोय ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
एवढा आत्मविश्वास हवा
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर yourdailyguide99 नावाच्या अकाऊंवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 7.5 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 61 लाखांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर जोरदार कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले – ‘इंग्रजी बोलण्यासाठी इतका आत्मविश्वास आवश्यक आहे,’ तर काहींनी लिहिले – तो चांगला प्रयत्न करत आहे. अनेकांनी रिक्षाचालकाचे कौतुक केले आहे.