सारी आशिकी निकल गई! पठ्ठ्याने गर्लफ्रेंडला मिठीत घेतलं, गोल भिरकवलं इतक्यात...; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Couple Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट, तर कधी जुगाड, तर कधी भांडणाचे अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये कपल्सच्या रोमान्स तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा कपल्स आपले प्रेमसंबंध कोणला कळू नये म्हणून लपून-छपून बसत भेटतात. त्यांना कोणी वेगळे करु नये याची भीती असते.
सध्या सोशल मीडियावर शाळेतील कपल्सचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक कपल लपून भेटत आहेत. यावेळी त्यांचा रोमान्स सुरु आहे. पण त्यांच्यासोबत असे काही घडते की पाहून लोक सतत हसत आहेत. सध्या या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आणि दोन मुली एका गल्लीत गप्पा मारत आहे. यातील एका मुलीला म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडला उचलून मिठीत घेतो. तिला भिरकावतो. मुलगीही लाजत असते. याच वेळी गल्लीतील एका घरातील एक व्यक्ती या मुलांच्या अंगावर पाणी फेकतो. यामुळे तिघेही घाबरतात आणि तिथून पळून जातात. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की पाहून तुम्हालाही हसू येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
ऐसी हरकतें करते हुए जो भी दिखाई दे, उनके ऊपर पानी ना फेंके, ईट, पत्थर फेंके ताकि भविष्य में पब्लिक पैलेस में ऐसा ना करें.🙏🙏 pic.twitter.com/FGQ8oqutZP — Amrita mishra (काशी वाली ) (@Amrita_2121) October 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Amrita_2121 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने हे आमच्या भागात झाले असते तर लोकांनी त्यांचे पाय तोडले असते, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने काय झालेय आजच्या पिढीला असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.