Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रीमध्ये उपचार मिळताच जर्मन टूरिस्ट झाला खुश, मन भरुन केलं भारताच्या सरकारी रूग्णालयाचं काैतुक; इंटरनेवर Viral झालीये प्रतिक्रिया

German Tourist Video : सरकारी रुग्णालयात मोफत उपचार घेतल्यानंतर पर्यटक भारतावर झाला खुश. व्हिडिओ बनवत मन भरुन त्याने केलं सरकारी रुग्णालाचं काैतुक. तसेच त्याने जर्मनीतील वैद्यकीय उपचारांचेही वास्तव सांगितले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 12, 2026 | 12:00 PM
फ्रीमध्ये उपचार मिळताच जर्मन टूरिस्ट झाला खुश, मन भरुन केलं भारताच्या सरकारी रूग्णालयाचं काैतुक; इंटरनेवर Viral झालीये प्रतिक्रिया

फ्रीमध्ये उपचार मिळताच जर्मन टूरिस्ट झाला खुश, मन भरुन केलं भारताच्या सरकारी रूग्णालयाचं काैतुक; इंटरनेवर Viral झालीये प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  • परदेशातून आलेल्या व्यक्तीचा भारतातील आरोग्यसेवेबद्दल अनोखा अनुभव समोर आला.
  • उपचार प्रक्रियेदरम्यान काही गोष्टींनी त्याला विशेषतः आश्चर्यचकित केले.
  • हा अनुभव सोशल मिडियावर शेअर होताच लोकांमध्ये मोठी चर्चा रंगली.
भारत हा वैद्यकीय पर्यटनाचे जागतिक क्रेंद्र बनत चालला आहे. दरवर्षी देशात हजारो पर्यटक हे स्वस्तात उपचार करुन घेण्यासाठी देशाला भेट देतात. भारत हा फक्त आता आपल्या मसाल्यांसाठीच नाही तर जगभरात त्याच्या आधुनिक सुविधा आणि कमी खर्चात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांसाठीही ओळखला जातोय. अमेरिका आणि युरोपसारख्या विकसित देशांच्या तुलनेत भारतातील वैद्यकीय उपचारांचा खर्च अंदाजे ६० ते ८० टक्क्यांनी कमी आहे. हेच कारण आहे की जगभरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारांसाठी भारताची निवड करतात.

धक्कादायक! गोदामात साफसफाई करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडला गोण्यांचा ढिग, लोकांनी केला आक्रोश अन् पुढे जे घडलं… Video Viral

यासंबंधितच एक अनोखा व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होताना दिसून आला आहे. हा व्हिडिओ एका जर्मन पर्यटकाचा असून यात तो भारतातील सरकारी रुग्णालयांची मनभरुन प्रशंसा करताना दिसून आला. रुग्णालयातील आपला अनुभव शेअर करताना त्याने व्हिडिओ शूट केला आणि सोशल मिडियावर व्हिडिओला पोस्ट केले. दरम्यान काही वेळातच हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने शेअर होऊ लागला. यात तरुणाने भारताच्या सरकारी रुग्णालयातील त्याचा अनुभव शेअर केला आहे.

तरुण व्हिडिओत काय म्हणाला…

या जर्मन पर्यटकाचे नाव डेव्हिड नेबेल असे आहे. तो मूळचा जर्मन येथील रहिवाशी असून भारतात तो पर्यटनासाठी आला होता. याकाळातच त्याला भारतातील एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. कुत्रा चावल्यानंतर रेबिज आजाराचा धोका असतो ज्यामुळे तो तात्काळ गुजरातमधील सुरत येथील एका सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला. डेव्हिडच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील त्याचा अनुभव फारच आश्चर्यकारक होता. त्याला तिथे उपचारांसाठी कोणतेही पैसे द्यावे लागले नाही आणि फ्रिमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. पर्यटकाला जर्मनीत अशी मोफत वैद्यकीय सेवा मिळणे जवळजवळ अशक्य आहे ज्यामुळे पहिल्यांदाच मिळालेल्या मोफत उपचाराने त्याला थक्क केलं.

मुलीने साजरा केला बापाचा आनंद, महाराष्ट्र पोलिसात भरती होताच वडिलांना खांद्यावर उचलून नाचवलं; हृदयस्पर्शी Video Viral

डेव्हिडला रुग्णालयात एकूण चार इंजेक्शन्स देण्यात आली आणि कोणकोणती खबरदारी घ्यायला हवी यासाठीचे मार्गदर्शनही केले गेले. त्याला रुग्णालयात स्वच्छता आणि सुव्यवस्थाही दिसून आली जी पाहून तो थक्क झाला. सरकारी रुग्णालयात इतक्या उत्कृष्ट आणि वेगवान सुविधा दिल्या जात आहेत हे पाहून तो चकित झाला. त्याने सांगितले की, जर जर्मनीमध्ये एखाद्या परदेशी व्यक्तीला असाच अनुभव आला असता, तर त्यांना मोफत उपचार मिळाले नसते. यामुळेच भारताच्या आरोग्यसेवा प्रणालीने त्याला खूप प्रभावित केल्याचे त्याने म्हटले. हा व्हिडिओ @indo.german.vibes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने या घटनेवर आपले मत व्यक्त केले असून एका यूजरने म्हटले की, “भारतात, सरकारी रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठीची लसीकरणे ती १२ वर्षांची होईपर्यंत मोफत असता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काळजी घे, भावा आणि भारताविषयी अप्रतिम भावना जागवल्याबद्दल धन्यवाद”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: German tourist impress with indian government hospital shares the experience viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Germany
  • Government Hospital
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral
1

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
2

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
3

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
4

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.