(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
सदर व्हिडिओ हा महाराष्ट्रातील बीड येथून समोर येत आहे. व्हिडिओमध्ये यशाचा जल्लोष मोठ्या उत्साहात लोक साजरा करताना दिसत आहेत. तर यातील लक्षवेधी गोष्ट बाप-लेकीची जोडी ठरली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, मुलीने आपल्या वडिलांना खांद्यावर बसवले आहे आणि आनंदातच ते दोघेही नाचत आहे. माहितीनुसार, मुलगी महाराष्ट्र पोलिसात भरती झाल्याचे सांगितले जात आहे. तिच्या यशानिमित्तच हा जल्लोष साजरा केला जात होता ज्यात वडिलांना खांद्यावर बसवून तिने आपला आनंद साजरा केला. वडिलांना आपल्या मुलीवर विश्वास होता की ती एक दिवस यशस्वी होईल आणि जेव्हा तो दिवस सत्यात उतरला तेव्हा त्यांचा उर अभिमानाने भरुन आला. व्हिडिओतील दृष्यांनी यूजर्सचे लक्ष वेधले असून बापाच्या आनंदाने अनेकांना सुखद आनंद दिला. ही घटना मनाली जोडणारी होती जी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अनुभवण्याची इच्छा असते. बापाला लेकीने मिळवून दिलेला तो आनंद त्याच्या संपूर्ण जीवनाच्या कष्टाला सार्थकी लावतो.
हा व्हिडिओ @upsc_trick_only नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. “आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण” असे व्हिडिओत लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात एका यूजरने म्हटले की, “मुलीला माता जगदंबाचे स्वरुप का मानले जाते ते तू सिद्ध केलंस ताई”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज मी पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरंच याहून सुंदर सुख नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






