
हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत रंगेहात पकडली गेली पत्नी, पतीने हाणामारी करतच काढलं बाहेर; Video Viral
काय आहे प्रकरण?
सदर घटना ही गाझियाबादच्या बाजरिया परिसरात घडून आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतीला आपल्या पत्नीवर संशय होता ज्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी तो ‘होटल क्विज’ आणि ‘होटल फार्म इन’जवळ पोहचला. इथे त्याने आपल्या पत्नीला एका दुसऱ्या पुरुषासोबत रंगेहात पकडलं. पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पकडताच पतीला राग अनावर झाला आणि त्याने प्रियकराची धुलाई करायला सुरुवात केली. सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात पती प्रियकराला पकडून हाॅटेल रुमच्या बाहेर घेऊन जाताना दिसतो. पती इतका संतापलेला असतो की, रागाच्या भरात तो प्रियकराला बेदम मारहाण करायला सुरुवात करतो. ही घटना सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत असून प्रियकराला मार दिला ते बरोबर केलंत अशा प्रतिक्रिया यूजर्स व्हिडिओला देत आहेत.
Extra-Marital affair Kalesh ( Husband caught his wife with her boyfriend inside Hotel Room, Beat the boyfriend up on the street) Ghaziabad UP pic.twitter.com/Dui7Qc031A — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 15, 2026
या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘विवाहबाह्य संबंधांवरून राडा (गाझियाबाद, उत्तर प्रदेश: पतीने पत्नीला हॉटेलच्या खोलीत तिच्या प्रियकरासोबत पकडले आणि रस्त्यावर प्रियकराला मारहाण केली)’. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “हॉटेलची खोली न्यायालय बनली आणि रस्त्यावर निकाल लागला. ही काही ती हाताळण्याची योग्य पद्धत नव्हे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही वागणूक पत्नीलाही मिळायला हवी होती… उलट तिला तर ती अधिक मिळायला हवी होती असं मला वाटतं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्याला मारहाण करण्यात काय अर्थ आहे, जेव्हा तुझी पत्नीही त्यात सामील होती? तुझा विश्वासघात कोणी केला? त्याने की तिने? मग मारहाण कोणाला करायला हवी?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.