(फोटो सौजन्य: X)
काय होती चिमुरडीची मागणी?ko
काॅकरोच जनता पार्टीच्या उपोषणात सामील झालेल्या चिमुरडीला पाहून एका पत्रकाराने तिच्याशी संपर्क साधू पाहिला. त्याने मुलीला विचारले की, तिची काय मागणी आहे? याच्या उत्तरात चिमुकलीने सांगितले की, मला धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान मोदी यांना सांगायचे आहे की, मी तुम्हाला दोन पर्याय देते. एकतर तुम्ही राजीनामा द्या आणि माफी मागू नका. किंवा तुम्ही इथे मंचावर या आणि माफी मागा, पण राजीनामा देऊ नका.” यानंतर पत्रकार मुलीला म्हणतो की, “तू लवकरच पाॅप्यूलर होणार आहेस. यावर चिमुकली उत्तर देत म्हणते की, हा माझा पहिला व्हिडिओ नाहीये, याआधी मी चार व्हिडिओ बनवले आहेत”.
तुम्हाला जराही लाज नाही…
व्हिडिओत मुलगी पुढे म्हणते की, “मी धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छते की, तुम्हाला जराही लाज वाटत नाही. भारताचे इतके मोठे शास्त्रज्ञ आजारी पडलेत. मागील १६ दिवसांपासून ते इथे आहेत”. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मागील १७ दिवसांपासून सोनम वांगचुक जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून अद्याप मोदी किंवा शिक्षणमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. नीट पेपरलीक प्रकरणानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काॅकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके देखील आपल्या टीमसह जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत.
7-YEAR-OLD PRACHI GIVES MODI AND PRADHAN TWO OPTIONS 🚨 ABHINAV: What do you want to say? PRACHI: Modi ji and Dharmendra Pradhan ji, you have two choices. Resign without saying sorry, or come to this stage and say sorry without resigning. ABHINAV: Why did you come here?… pic.twitter.com/svSI0xyWV0 — Mr Sharma (@sharma_views) July 14, 2026
स्पेसमधून कशी दिसते पृथ्वी? प्रकाश आणि चंद्राचा लपंडाल… अद्भूत दृष्य कॅमेरात कैद; Video Viral
प्रकृती सातत्याने ढासळत चालली आहे…
आज मंगळवार १५ जून २०२६ रोजी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या १७ वा दिवस सुरु झाला आहे. या उपोषणामुळे त्यांचे वजन बरेच कमी झाले असून प्रकृतीही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सीजेपीनुसार, त्यांचे वजन ८.२ किलोग्रॅम कमी झाले आहे. अभिजीत दीपकेने सोशल मिडियावर त्यांच्या प्रकृतीची माहिती देत सांगितलं की, त्यांचे स्नायू कमकुवत होत असून ते अत्यंत वेदनादायी परिस्थितीत आहेत. अन्य सर्वांप्रमाणेच मी देखील त्यांना उपोषण संपवण्याचे आवाहन केले. पण त्यांनी शांतीपूर्वक उत्तर देत म्हटले की, उपोषण संपवायला सांगू नको तर सरकारला विचार की त्यांना संभाषण का करायचं नाहीये.






