भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण अन् संतापलेल्या पत्नीने अचानक दगड उचलला अन्..., पाहा काय घडलं? VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय घडलं?
एका पती-पत्नीच्या खाजगी वादारे रुपांतर जाहीर तमाशामध्ये झाले आहे. वाद सुरु असताना महिलेने असे काही केले आहे पाहून आसपासचे सर्वजण हादरले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशरह येथे घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की महिला पतीच्या दुचाकीवर दगडफेल करताना दिसत आहे. महिला अतिशय संतापलेली असून तिने दुचाकीचे तुकडे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोडपे प्रवासासाठी निघाले होते. यावेळी कोणत्यातरी मुद्द्यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद एवढा वाढला की पत्नीने थेट रस्त्याच्या मधोमध गाडी थांबलली. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु होता. पतीने अचानक दुचाकी तिथेच सोडली आणि तो निघून गेला. यानंतर महिलेने संतापून पत्नीच्या गाडीवर दगडफेकण्यास सुरुवात केली.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vishnugupta9030 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या घटनेला चुकीचे आणि लज्जास्पद म्हटले आहे. कौटुंबिक वादाचा तमाशा करणे योग्य नाही असे लोकांनी म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने दुचाकी का फोडली पण असा प्रश्न केला आहे. तर काहींनी पठ्ठ्यानेच काहीतरी केलं असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






