(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
एखाद्या चित्रपटासारखी वाटणारी ही घटना शिखा सिंह आणि तिचा पती साैरभ याच्यासोबत घडून आली. रिपोर्ट्सनुसार, पती-पत्नी दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद सुरु झाला ज्यानंतर शिखाने हुंड्याचा खोटा खटला दाखल करत पती साैरभकडे घटस्फोटाची मागणी केली. हा खटला केवळ एक-दोन दिवस नव्हे, तर पाच वर्षे चालला. या पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईत शिखाच्या वडिलांची आयुष्यभराची सर्व बचत संपली. आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे शिखाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला ज्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर होती.
पतीने दाखवला मोठेपणा
शिखाचे वडिल सरकारी रुग्णालयात गंभीर परिस्थितीत आहे याची माहिती मिळताच पती साैरभने सर्व वैर बाजूला सारले आणि तो लगेच रुग्णालयात गेला. आपल्या सासऱ्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी साैरभने सरकारी रुग्णालयातून त्यांना प्रायव्हेट हाॅस्पिटलमध्ये भरली केले. त्यांचा उपचाराच्या खर्चाची जबाबदारी देखील साैरभने उचलली.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कोर्टात साैरभ आणि शिखाच्या घटस्फोटाची सुनावणी होती. परंतु आपल्या वडिलांसाठी पतीने उचलले हे पाऊल पाहून शिखाच्या मनातून पतीबाबतचा कडवटपणा संपुष्टात आला होता. काही सेकंदाच्या या व्हिडिओत नवरा-बायको कोर्टाबाहेर दोघांना घट्ट मिठी मारत घटस्फोटाचा निर्णय मागे घेताना दिसून येतात. दोघांमधील हे भावनिक क्षण तिथे उपस्थित एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले ज्यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला.
Shikha Singh had a fight with her husband and got a fake dowry case filed against him, and then started demanding a divorce. For 5 years, the case dragged on, and the girl’s father’s entire savings were exhausted. When he suffered a heart attack, due to lack of money, he had to… pic.twitter.com/44MzMcLsJD — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 12, 2026
ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्
व्हिडिओला @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले असून यूजर्सने या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “हा माणूस पुन्हा अशी चूक करत आहे, ज्याबद्दल त्याला आयुष्यात नंतर पश्चात्ताप होईल. हा केवळ परिस्थितीमुळे झालेला समेट आहे, जो काळानुसार ओसरून जाईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकालच्या भारतीय महिलांना ‘देवी’ म्हणू नये. त्या तर ‘शूर्पणखा’ आहेत; त्यांना फक्त पैशाचाच लोभ असतो…” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तिने प्रेमापोटी ती कागदपत्रे फाडली नाहीत, तर केवळ हतबलतेमुळे तसे केले; कारण तिच्या वडिलांना पैशांची गरज होती. जर ते आजारी पडले नसते, तर सौरभ अजूनही कोर्टाच्या फेऱ्या घालत बसला असता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






