(फोटो सौजन्य: Instagram)
कुठे घडली घटना?
माहितीनुसार सांगण्यात येत आहे की, सदर घटना इटलीच्या एका रेस्टाॅरंटमध्ये घडून आली. इन्फ्लुएंसर खुशी दुबे आपल्या मैत्रिणींसोबत जेवण करण्यासाठी रेस्टाॅरंटमध्ये गेली होती जिथे वेटरसोबत त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी हुसैन नावाच्या वेटरने कथितरित्या महिलांसोबत गैरवर्तन केले आणि नंतर भारताविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली. तो मूळचा बांग्लादेशचा रहिवाशी असल्याची माहिती आहे. आपल्या देशाविषयी चुकीचे बोलले जात आहे हे समजताच महिला चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी वेटरला धडा शिकवण्याचा निर्धार केला.
पोलिसांसमोर मागितली माफी
माहितीनुसार, वेटर आणि महिलांमधील हा वाद इतका वाढला की यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. व्हिडिओमध्ये महिला पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देत व्यक्तीकडून माफी मागवण्याची विनंती करतात. व्हिडिओमध्ये खुशी वेटरवर दबाव टाकताना स्पष्टपणे म्हणते, “भारताचा अपमान केल्याबद्दल मी माफी मागते असे म्हणा.” सुरुवातील माफी मागण्यासाठी तोे तयार नव्हता पण महिला आणि पोलिसांच्या दबावामुळे तो अखेर माफी मागायला तयार झाला.
View this post on Instagram
जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…
सोशल मिडिया यूजर्स खुश
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोक महिलेच्या या कृतीवर खुश झाले. कोणत्या देशाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे चुकीचे आहे आणि जर कुणी असे करत असेल तर त्याला याचा धडा शिकवायलाच हवा अशा प्रतिक्रिया लोक व्हिडिओला देत आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी कमेंट करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “देशाचा अपमान कोणालाही सहन होणार नाही!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्वतःसाठी नाही, देशासाठी उभं राहणं यालाच म्हणतात” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मुलींनी चांगला धडा शिकवला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






