
चेहरा लपवून सरकारी बसमध्ये चढले परिवहन मंत्री! सुट्ट्या पैशांवरून वाद अन् कंडक्टरने थेट..., (Photo Credit- X)
परिवहन मंत्री बायराथी सुरेश हे हेब्बाल ते नागाशेट्टीहल्ली या मार्गावरील बसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान तिकीट काढण्यासाठी मंत्र्यांनी कंडक्टरला १०० रुपयांची नोट दिली. मात्र, आपल्याकडे सुट्टे पैसे नसल्याचे सांगत कंडक्टरने मंत्र्यांशी वाद घातला आणि त्यांना थेट बसमधून खाली उतरण्यास सांगितले. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनाच त्यांच्याच विभागाच्या बसमधून सुट्ट्या पैशांसाठी अशा प्रकारे हाकलून दिल्याचा हा प्रकार सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आला आहे.
Karnataka Transport Minister @byrathi_suresh travelled incognito on 10+ BMTC buses.across Bengaluru for 2 hours wearing a mask to inspect services firsthand. He suspended a driver and conductor after a bus failed to stop for passengers. In another bus, a conductor asked him to… pic.twitter.com/celtwAXIPG — ChristinMathewPhilip (@ChristinMP_) July 12, 2026
सुमारे दोन तास चाललेल्या या औचक निरीक्षणादरम्यान मंत्र्यांनी १० पेक्षा जास्त बसेसची तपासणी केली. यावेळी बस क्रमांक KA-57 F-3372 मध्ये एक धक्कादायक प्रकार मंत्र्यांच्या नजरेस पडला. एका प्रवाशाने बस स्टॉपवर उतरण्यासाठी वारंवार विनंती करूनही ड्रायव्हर आणि कंडक्टरने गाडी थांबवली नाही. सामान्य प्रवाशांप्रती असलेल्या या बेजबाबदार आणि उद्धट वर्तनाची मंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी मंत्र्यांनी तात्काळ प्रभावाने त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला जागेवरच निलंबित करण्याचे आदेश दिले.
बसमधील प्रवासानंतर मंत्र्यांनी नागाशेट्टीहल्ली भागात ऑटोरिक्षा चालकांच्या मनमानी कारभारावरही कारवाई केली. एका ऑटो चालकाने मीटरमध्ये ३० रुपये भाडे दाखवत असतानाही प्रवाशाकडे ३६ रुपयांची मागणी केली होती. मंत्र्यांनी स्वतः यात हस्तक्षेप करत त्या ऑटो चालकाला चांगलाच इंगा दाखवला. “बंगळुरूमध्ये प्रवाशांचा प्रवास सुकर करणे, वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणणे आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मी यापुढेही अशा प्रकारे चेहरा लपवून रात्रीच्या वेळी अचानक तपासणी करत राहणार आहे,” असा इशारा परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी दिला आहे.