संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
क्या चोर बनेगा रे तू! चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला; कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका, Video Viral
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डिलिव्हरी बॉयची ओळख २२ वर्षीय विजय मल्लिकार्जुन पटवण्यात आली आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने तिला वॉशरुम वापरण्यासाठी विचारले. इमर्जन्सीच्या आहे असे सांगून तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला मी अनोखळी व्यक्तीला घरात घेऊ शकत नाही. खूपच गरज असेल तर शेजारी राहणाऱ्या माझ्या पुरुष मित्राची मदत घेऊ शकता असे सांगितले. परंतु महिलेच्या नकारानंतरही डिलिव्हरी बॉय घरचा जबरदस्तीने घुसला.
यावेळी महिलेने घाबरुन न जाता मोबाईल कॅमेरा ऑन केला आणि फ्लॅटचा दरवाजा उघडाच ठेवला. यामुळे काही घडल्यास ती ओरडून मदतीसाठी बाहेर धाव घेऊ शकते. पण डिलिव्हरी बॉय वॉशरुममधून बाहेर येताच त्याने महिलेसमोर थेट त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवला. या धक्कादायक प्रकाराने महिला पूर्णपणे हादरून गेली होती. तिने त्याला तातडीने बाहेर काढले. यानंतर तिने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपबीती सांगितली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बंगळुरुच्या पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर महिलेच्या तक्रारीवरुन लैंगिक छळाचा आणि महिलेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहवण्याचा, जबरदस्तीने घरात घुसण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bengaluru, Karnataka | DCP White Field Bengaluru says, “A case has been registered at Marathahalli Police Station following a complaint by Niloufer Fatima alleging sexual harassment by a Flipkart delivery agent, identified as Vijay Mallikarjun Kamath. Based on her complaint,… pic.twitter.com/UoOONBEWEG — ANI (@ANI) July 12, 2026
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






