इतक्या जवळून मरण बघितलंय का कधी? घराच्या बाहेर येताच घडलं असं काही... धडकी भरवणारा Video Viral
असं म्हणतात मृत्यू एक अशी एक गोष्ट आहे जी अटळ आहे. आपण कितीही प्रगती केली असली कोणाचाच मृत्यू आपल्या हातात नाही. अशात तुमचा मृत्यू आला असेल तर ते कसेहवी करून ते घडणारच. याचिच प्रचिती देणारा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने संपूर्ण सोशल मीडिया हादरून टाकली आहे. लोकांचा हा व्हिडिओ पाहून आता थरकाप उडत आहे. नक्की या व्हिडिओमध्ये असे काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपले मनोरंजन करतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. यात काही व्हिडिओ असेही असतात ज्यांना पाहून आपला थरकाप होऊ लागतो. सध्या असाच एक धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच तो वेगाने व्हायरल झाला. व्हिडिओतील थरारक दृश्ये आणि काळजात धस्स करून टाकणारी ही घटना पाहून आता अनेकजण हैराण झाले आहेत. मृत्यूचा थरारक खेळ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेदेखील वाचा – बॉईज हॉस्टेलवर पडला छापा, खोलीची घेतली झडती अन् पलंगातून निघाली अशी वस्तू… Viral Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये पाहिले तर सुरुवातीलाच सर्वत्र आधार झाल्याचे दिसून येते. यात मुसलदार पाऊस आणि वेगवान वाऱ्याने हलणारी काही झाडे दिसून येत आहेत. अशातच एक व्यक्ती त्याच्या घराबाहेरील अंगणात उभा राहून मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत असतो. तेवढ्यात असे काही घडते ज्याचा कोणी विचारही केला नसावा. व्यक्ती उभा राहून या वातावरणाचा व्हिडिओ काढत असतानाच अचानक त्याच्या अगदी जवळ, त्याच्या पुढ्यातच एक मोठी वीज येऊन पडते. मात्र सुदैवाने तो बचावला जातो. मागे टाकलेल्या एका पावलामुळे या व्यक्तीचा जीव वाचला मात्र स्वत:चा मृत्यू इतक्या जवळून पाहिल्यामुळे हा व्यक्ती घाबरून जातो. या सर्व घटनेचे दृश्ये कॅमेरात कैद झाले असूज ही घटना आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हालाही काहीवेळासाठी आश्चर्याचा धक्काच बसेल.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डाव पलटला! प्लॅन करून तरुणी गेल्या चोरी करायला पण घडलं भलतंच, Video Viral
हा थरारक आणि हृदयात धडकी भरवणारा व्हिडिओ @gavakadchi_shetiii नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, ‘इतक्या जवळून मरण बघितलं का तुम्ही’ असा लिहिण्यात आलं आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “जास्त करून नारळाच्या झाडावर विज पडत असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मोहोळ तालुक्यातील खंडाळी या ठिकाणी झालेली घटना आहे ही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावा तू तो डायलॉग अक्षरशः जगलास… “मौत को छुके टक्क से वापस”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.