सोशल मीडियावर नेहमीच अनेक रंजक तसेच काही धक्कादायक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात काही अशा व्हिडिओजचा देखील समावेश असतो, जे पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सध्या सोशल मीडियावर एका हॉस्टेलशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हॉस्टेल म्हटलं की अनेकांना आपले हॉस्टेलचे मजेदार दिवस आठवू लागतात. मित्रांसोबत केलेली मजा आणि अविस्मरणीय आठवणी! मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या हॉस्टेलच्या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
काय आहे व्हिडिओत?
हॉस्टेलची झडती घेतली असता एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली. याचा व्हिडिओ एकाने आपल्या कॅमेरात कैद केला असून आता हा वेगाने व्हायरल होत आहे. तर झाले असे की, हॉस्टेलमधील एक मुलगा मजा म्हणून दुसऱ्या मुलाच्या रूममध्ये जातो आणि त्याची करामत उघडकीस करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो रूममधील बेड वर उचलतो आणि पाहतो तर काय…अवघ्या काही सेकंदातच त्यातून धक्कादायक गोष्ट बाहेर पडू लागते. ही गोष्ट पाहून आत सोशल मेडिया युजर्स अचंबित झाले आहेत.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डाव पलटला! प्लॅन करून तरुणी गेल्या चोरी करायला पण घडलं भलतंच, Video Viral
व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या खोलीत शिरतो आणि त्याचा बेड हवेत उचलतो. आणि दुसऱ्याच क्षणी बेडच्या रॉडमधून एका नाही दोन नाही तर चक्क शेकडो सिगारेटचे तुकडे आणि राख बाहेर पडू लागते. विद्यार्थी खोलीत सिगारेट ओढत त्यांची घाण होस्टेलच्या लोखंडी पलंगाच्या पायांच्या आत टाकत असल्याचे यातून दिसून येत आहे. हा एक लोखंडी पलंग आहे, ज्याच्या वरच्या बाजूला एक छिद्र असेल आणि पाय आतून पोकळ असतील. त्यामुळे सर्व सिगारेटचे बुटके लोखंडी पायांमध्ये जमा होत राहिले. ही धक्कादायक बाब पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.
हेदेखील वाचा – शिखर धवनलाही लागलं लड्डू मुत्त्या बाबांच वेड, फिरता पंखा थांबवत दिला आशीर्वाद, हास्यास्पद Video Viral
हा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ @ghantaa नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘जस्ट बॉईज थिंग’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुलांचे हॉस्टेल नेहमीच भितीदायक असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हॉस्टेल आहे की कँसर हॉस्पिटल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.