सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ अनेकदा युजर्सची मनोरंजन करण्याचे काम करतात. यात बऱ्याचदा काही धक्कादायक घटना देखील सामील असतात. तर सध्या चोरीशी संबंधित एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चोरीचा व्हीडीओ म्हटलं तर तुम्हाला वाटेल की, हा भीतीदायक व्हिडिओ असेल मात्र असे नाही. हा व्हिडिओ खरंतर फार हास्यास्पद आहे. चोरांची झालेली फजिती यात दिसून येत आहे.
सध्या व्हायरल होत असलेला या चोरीच्या व्हिडिओचा शेवटी असा होतो की पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. या मजेदार व्हिडिओमध्ये दोन मुली रात्रीच्या अंधारात चोरी करण्यासाठी आल्या आहेत. सुरुवातीला या मुली हुशार चोर वाटतात, पण चोरीच्या उद्देशाने फ्लॉवर पॉट उचलू लागताच प्रकरण रंजक बनते. दोन्ही मुली एका निर्जन रस्त्यावर स्कूटर घेऊन येतात आणि भलामोठा फ्लॉवर पॉट चोरण्याचा बेत आखतात. व्हिडिओतील दृश्ये आणि मुलींची ही करामत व्हिडिओची रंजकता आणखीन वाढवते.
हेदेखील वाचा – शिखर धवनलाही लागलं लड्डू मुत्त्या बाबांच वेड, फिरता पंखा थांबवत दिला आशीर्वाद, हास्यास्पद Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की, जेव्हा मुली फ्लॉवर पॉट उचलून स्कूटरवर बसण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अचानक त्यांचा तोल जातो. स्कूटर हलवताच फ्लॉवर पॉट आणि स्कूटरसह दोघेही एकत्र फ्लॉवर पॉटसह जोरदार जमिनीवर आदळतात. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना हसू अनावर झाले आहे. हा सीन इतका मजेशीर आहे की लोक ते पुन्हा पुन्हा पाहत याची मजा लुटत आहेत. त्यांचा चोरीचा प्रयत्न आता एक मजेशीर किस्सा बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेदेखील वाचा – उशीच्या आत लपला होता विषारी साप, उघडून पाहताच फणा काढला बाहेर अन्… थरारक घटनेचा Viral Video
चोरीचा हा मजेदार व्हिडिओ @sutta_gram नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सो कॉल्ड नेचर लव्हर’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दिवाळीची मजा नाही दिवाळीची सजा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यशस्वीरीत्या मिशन अयशस्वी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय चोर बनणार गं तू”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.