बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या तिच्या आगामी Amazon Prime Video Original ‘Maja Ma’ मुळे खूप चर्चेत आहे. मजा माची रिलीज डेट जवळ आला असून त्याचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. दरम्यान, माधुरी दीक्षितने मुंबईत नवीन अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी येत आहे. माधुरीचे हे अपार्टमेंट मुंबईच्या लोअर परेल भागात असून ते 53 व्या मजल्यावर आहे.
झॅपकीने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरी दीक्षितने मुंबईच्या लोअर परेल भागात एक नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत 48 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अहवालानुसार, या मालमत्ता इंडियाबुल्स ब्लू प्रोजेक्टमध्ये आहेत आणि त्याची नोंदणी 28 सप्टेंबर 2022 रोजी झाली होती. माधुरीचे हे अपार्टमेंट 53 व्या मजल्यावर आहे असून ते 5384 स्क्वेअर फूट आहे. माधुरीला या अपार्टमेंटसोबत 7 कार पार्किंग आहेत. या अपार्टमेंटचा विक्रेता कॅलिस लँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरीने वरळीतील इंडियाबुल्स ब्लू बिल्डिंगमध्ये एक प्रॉपर्टी लीजवर घेतली आहे. ही मालमत्ता 29 व्या मजल्यावर आहे आणि यासाठी माधुरीने 3 कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यात दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. ही मालमत्ता 5500 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माधुरी दीक्षितने मुंबईत तीन वर्षांसाठी घर भाड्याने घेतले होते. भाड्याच्या घरासाठी माधुरी दरमहा 12.5 लाख रुपये भाडे देत होती.