इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन्...; पहा काय घडलं? Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावर गाड्यांची मोठी रहदारी सुरु आहे. येथेच एक मोठा टॅम्पो नारळ घेऊन जात आहे. या गाडीच्या अगदी मागे एक दुचाकीस्वार येत आहे. नारळ असणाऱ्या गाडीचा वेग कमी असल्याचा फायदा घेत हा दुचाकीस्वार थेट धावत्या गाडीतून चोरण्याचा प्रयत्न करतो. बाईक चालवता चालवता हळूच गाडीच्या मागे हात टाकून नारळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.
एक नारळ बाहेर ओढलाही जातो, पण तो अनेक नारळांमध्ये अडकलेला असल्याने त्याच्या हातात येत नाही. तरीही तो नारळ ओढण्याचा प्रयत्न करतो राहतो. या ओढाओढीत पठ्ठ्याचा बाईकरुन कंट्रोल सुटतो आणि बाईकसह खाली कोसळतो. विशेष म्हणजे पठ्ठ्या तरीही नारळ सोडायला तयार नाही. बाईक तशीच सोडून गाडीच्या मागे जातो. परंतु तोपर्यंत टॅम्पोचा वेग वाढलेला असतो आणि दुसरीकडे त्याची बाईक रस्त्यावर मध्येच पडल्याने इतर गाड्या हॉर्न वाजवायला सुरु करतात. यामुळे तरुण हताश होऊन परत जातो.
Salary Increase Nahi Ho Rahi
मैंने सोचा आज सब्जी चुरा लूंगा आसानी से, ट्रक में हाथ मारा और सीधा गिर पड़ा सड़क पर!
सब्जी भी नहीं मिली और इज्जत भी चली गई! बाद में वीडियो वायरल हुआ तो देखकर हंसी नहीं रुक रही आप भी देखो… pic.twitter.com/HigsZIPf2b — Missu Files (@Shikandar92) June 30, 2026
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर@Shikandar92 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने नारळाचं माहित नाही, पण इज्जतीचा रायता झाला पठ्ठ्याच्या अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एकाने चोरी करणे योग्य नाही असे लिहिले आहे, तर तिसऱ्या एकाने जास्त हावरेपणा केल्यावर असंच होते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर हास्याचे पात्र ठरला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






