(फोटो सौजन्य: X)
रस्ते अपघातात गाईचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, परतवाडा रस्त्यावर एका अज्ञात धडकेत गायीचा जागीच मृत्यू झाला. ती गाय भटकी असल्यामुळे तिचा कोणीही मालक पुढे आला नाही. यामुळेच पुढील दोन दिवस गायीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडून राहिला. यानंतर पंचायतने मृतदेहाला हटवण्याची व्यवस्था केली. सांगितले जात आहे की, त्यावेळी मृतदेह उचलून नेण्यासाठी कोणतेही ट्रॅक्टर किंवा ट्राॅली उपलब्ध नव्हती ज्यामुळे कचऱ्याच्या गाडीमागे रश्शीने गायीच्या मृतदेहाला बांधण्यात आले आणि मग तिला कचरा टाकण्याच्या ठिकाणी नेले. यादरम्यान कचऱ्याच्या गाडीमागून जाणाऱ्या एका व्यक्तीने हे दृष्य आपल्या कॅमेरात केले आणि घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. लोक आता यातील दृष्ये पाहून भडकली असून नेटकऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
A dead cow was tied with a rope to a Gram Panchayat garbage vehicle and dragged for nearly 1 kilometre on the road in Jhallar village, Bhainsdehi Assembly constituency, instead of being transported with dignity for its last rites. The horrifying act came to light after local gau… pic.twitter.com/ixliM63osX — yash saghal (@YSaghal) June 29, 2026
व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
घटनेचा व्हिडिओ @YSaghal नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “या देशात कोणाच्याही जीवाची किंमत नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “राजधानी गुडगावमध्येच गायींची अवस्था पहा. बरेच लोक जे फक्त गायीला प्रार्थना करतात परंतु कोणत्याही आत्म्याचा आदर करत नाहीत किंवा त्यांच्या कल्याणाचा विचार करत नाहीत, हा दुसरा निरुपयोगी सरकारी ड्रायव्हर आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ते मरेपर्यंत त्यांचे दूध पितात, पण गाईंना मात्र अत्यंत वाईट वागणूक देतात. असे कृतघ्न लोक जगण्यासही पात्र नाहीत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






